Sindhudurg Crime : गोमांस प्रकरणात खळबळ! नितेश राणेंच्या विश्वासूसह भाजपच्या मंडल अध्यक्ष आणि तिघांना पोलिस कोठडी

Beef transportation Crime : गोमांस वाहतूक करत असल्याच्या संशयावरून दोडामार्गात एका तरुणाला मोठी मारहान करत त्याची कार जाळण्यात आली होती.
Nitesh Rane
Nitesh RaneSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. गोमांस प्रकरणात मंत्री नितेश राणेंच्या निकटवर्तीयासह भाजप मंडल अध्यक्ष आणि तिघांना पोलिस कोठडी सुनावली गेली आहे.

  2. या घटनेमुळे भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली असून स्थानिक राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

  3. प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे.

Dodamarg News : भाजप नेते मंत्री नितेश राणे पालकमंत्री असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलिसांनी भाजप पदाधिकाऱ्यासह नगराध्यक्षावर मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी नगराध्यक्षांसह 60 जणांवर गुन्हे दाखल केले असून पाचजणांना अटक केली आहे. तर अन्य फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे. नगराध्यक्षांसह इतरांनी गोमांस वाहतूक करत असल्याच्या संशयावरून तिलारी - पाताडेश्वर मंदिराजवळ एका तरुणाला जबर मारहान केली होती. ज्यात तो जखमी झाला होता. तसेच त्या तरूणाची कार देखील पेटवून देण्यात आली होती. या प्रकरणात दोडामार्ग पोलिसांत गुन्हा नोंद झाला होता.

या प्रकरणी मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी दुपारी निजामुद्दीन मोहम्मद सय्यद कुरेशी हा आपली कार घेवून तिलारी घाटमाथ्यावरून दोडामार्गकडे येत होता. यावेळी वीजघर चेकपोस्टवर त्याची कार तपासणी करण्यात आली. यावेळी पोलिसांना त्याच्या कारमध्ये मांस सापडले. यावेळी वरिष्ठांच्या आदेशानुसार, पोलिसांनी कुरेशी आणि कार गाडी पोलिस ठाण्यात पुढील चौकशीसाठी नेण्याची कारवाई केली.

ही कारवाई करत असतानाच तिलारी - पाताडेश्वर मंदिराजवळील 50 ते 60 जणांच्या जमावाने त्यांची कार रस्त्यावर अडवली. नगराध्यक्ष चेतन चव्हाण, भाजप दोडामार्ग मंडल अध्यक्ष दीपक गवस आणि इतरांनी गोमांस वाहतूक करत असल्याच्या संशयावरून बेभान होत कारवर जोरदार हल्ला चढवला.

Nitesh Rane
Nitesh Rane : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा तिढा सुटला? शासन निर्णय निघताच नितेश राणेंचा हल्लाबोल; म्हणाले, 'आता आभार मानावेत...'

कारच्या काचा फोडून तोडफोड केली. कारमधून गोमांस वाहतूक करण्यात येत आहे, याला मारा. पेट्रोल आणा, याला पेटवून द्या, कार पेटवा, असे म्हणत कुरेशी याच्यावर हल्ला केला. त्याला जबर मारहाण करण्यात आली. तसेच जमावाने कारवर पेट्रोल टाकून ती पेटवून दिली. या घटनेदरम्यान पोलिस कॉन्स्टेबल परशुराम सावंत घडनास्थळी उपस्थित होते. त्यांच्या तक्रारी नुसार जमाव बनवून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर प्रकरणात भाजप मंडल अध्यक्ष दीपक गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, महेंद्र खरवत, वैभव रेडकर, विजय कांबळे व इतर 60 अज्ञातांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप मंडल अध्यक्ष दीपक गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, महेंद्र खरवत, वैभव रेडकर, विजय कांबळे यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोडामार्ग न्यायालयाने पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली आहे.

पोलिस छावणीचे स्वरुप

या घटनेमुळे दोडामार्ग तालुका मुख्यालयाच्या इमारतीला पोलिस छावणीचे स्वरुप आले होते. या घटनेची माहिती मिळताच कोकण परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक संजय दराडे व पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर तात्काळ दोडामार्ग येथे दाखल झाले होते. तसेच दंगल पथक नियंत्रकांसह मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

Nitesh Rane
Nitesh Rane : नितेश राणेंचा मनोज जरांगे पाटलांना करारा जवाब; म्हणाले, "फडणवीसांच्या आईविषयी बोलाल तर जीभ हातात देऊ!"

FAQs :

प्र.१: गोमांस प्रकरणात कोण पोलिस कोठडीत गेले?
उ. मंत्री नितेश राणेंचे निकटवर्तीय, भाजप मंडल अध्यक्ष आणि आणखी एक व्यक्ती पोलिस कोठडीत गेले आहेत.

प्र.२: त्यांच्यावर कोणते आरोप आहेत?
उ. गोमांस वाहतूक प्रकरणात मारहाण व हिंसाचाराशी संबंधित गुन्ह्यांमध्ये त्यांची नावे आहेत.

प्र.३: या घटनेचा राजकीय परिणाम काय होईल?
उ. भाजपच्या प्रतिमेला धक्का बसू शकतो व विरोधकांना राजकीय मुद्दा मिळू शकतो.

प्र.४: भाजप मंडल अध्यक्षाची भूमिका काय आहे?
उ. ते प्रकरणात सक्रिय सहभागी असल्याचा आरोप आहे, ज्यामुळे त्यांना कोठडीत ठेवण्यात आलं आहे.

प्र.५: पुढील सुनावणी कधी होणार आहे?
उ. न्यायालयीन प्रक्रियेनुसार पुढील सुनावणी काही दिवसांत होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com