Shrirampur corporators join BJP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shrirampur corporators join BJP : दोन दिवसांपूर्वी भाजपच्या विखेंचा इशारा अन् श्रीरामपूरची काँग्रेस आज 'रिकामी'

Ahilyanagar Shrirampur Municipal Council 10 corporators joined BJP Mumbai Radhakrishna Vikhe Patil : श्रीरामपूर नगरपालिकेतील दहा नगरसेवकांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला.

Pradeep Pendhare

Maharashtra corporators join BJP : भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी दोन दिवसांपूर्वी श्रीरामपूरमध्ये आपण सातत्यानं लक्ष घालणार, असे सूचक संकेत दिले होते. या संकेतानंतर आज श्रीरामपूरची काँग्रेस रिकामी झाली आहे.

काँग्रेसमधील माजी आमदार जयंत ससाणे यांचे कट्टर समर्थक माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह 10 नगरसेवक, काँग्रेसचे पदाधिकारी व व्यापाऱ्यांनी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश झाला.

या नगरसेवकांसह काँग्रेसचे (Congress) तब्बल 100 ते 125 जणांनी भाजपच्या मुंबईतील कार्यालयात पक्ष प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यावेळी उपस्थित होते.

माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात श्रीरामपूरमध्ये लक्ष घालण्याचं सूचक विधान केलं होतं. विधानसभा निवडणुकीत संगमनेर, पारनेर, नेवासा काबिज केल्यानंतर विखेंचा श्रीरामपूरवर डोळा असल्याचे यातून राजकीय विश्लेषकांनी निरीक्षक नोंदवलं होतं. यानंतर दोन दिवसांनी श्रीरामपूरमधील काँग्रेस विखेंनी रिकामी केल्याचा आता पुढं आलं आहे.

श्रीरामपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. विधानसभा निवडणुकीत महायुतीची लाट असताना, देखील इथून हेमंत ओगले यांच्या रुपात काँग्रेसचा उमेदवार जिंकला. अहिल्यानगर जिल्ह्यात १२ विधानसभा मतदारसंघ आहे. त्यातील मतदारसंघात दहा महायुतीने बाजी मारली.

श्रीरामपूरमध्ये काँग्रेसने विद्यमान आमदार लहू कानडे यांचे तिकीट कापले होते. तिथं हेमंत ओगले यांना तिकीट दिलं. लहू कानडे यांनी ऐनवेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि निवडणूक लढली. महायुतीत इथं बंडखोरी झाली. माजी आमदार भाऊसाहेब कांबळे देखील निवडणूक लढवली. यात हेमंत ओगले यांचा काँग्रेसकडून निवडून आले. अहिल्यानगर जिल्ह्यात आता एकमेव काँग्रेसचा आमदार आहे.

विखेंशी ओगले जुळवून घेणार?

अशा या मतदारसंघात भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी लक्ष घातल्याने, त्यांच्यासमोर काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले कितपत टिकतात, याकडे लक्ष लागले आहे. तसं पाहिल्यास विखे कुटुंब काँग्रेसमध्ये असताना, हेमंत ओगले हे विखे यांचे समर्थक मानले जात होते. परंतु विखेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ओगले हे काँग्रेसमध्येच राहिले आणि बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर काँग्रेसमध्येच राजकीय प्रवास केला. विखे यांच्या राजकीय महत्त्वकांक्षेसमोर आमदार ओगले जास्त करून जुळवून घेतील, अशा शक्यता वर्तवली जात आहे. पण ते काँग्रेस पक्ष सोडणार नाही, असे देखील सांगितले जात आहे.

भाजपमध्ये प्रवेश करणारे पदाधिकारी

माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी, माजी नगरसेवक भारती कांबळे, दत्तात्रय सानप, शामलिंग शिंदे,आशिष धनवटे, राजू आदिक, कैलास दुबय्या, शशांक रासकर, मनोज लबडे, सोमनाथ गांगड, माजी सभापती संजय गांगड, दिगंबर फरगडे, माजी उपसभापती सुनील क्षीरसागर, सरपंच विराज भोसले, माजी सरपंच अ‍ॅड. युवराज फंड, व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष वैभव लोढा, सचिव दत्तात्रय ढालपे, उपाध्यक्ष निलेश बोरावके, उद्योजक पराग शहा, राकेश न्याती, संदीप अग्रवाल, चेतन भुतडा, योगेश डंबीर, चिरायू नगरकर, सिद्धार्थ फंड, अमोल शेटे यांच्यासह इतर 100 ते 125 जणांनी पक्ष प्रवेश केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT