Bjp Kirit Somaiya black flags : बीडमध्ये नेमकं काय घडलं; किरीट सोमय्यांना मुस्लिमांनी दाखवले काळे झेंडे

BJP former MP Kirit Somaiya black flag Muslim Parli Beed Maharashtra : बांगलादेशींनी बनावट सहीनं जन्मप्रमाणपत्र दिल्याचा आरोप करणाऱ्या भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना मुस्लिमांनी काळे झेंडे दाखवले.
Bjp Kirit Somaiya
Bjp Kirit Somaiya Sarkarnama
Published on
Updated on

Muslims protest Kirit Somaiya : बांगलादेशींची घुसखोरी, महाराष्ट्रात त्यांना छुप्यापद्धतीने मिळत असलेला आश्रय, यातून त्यांना मिळत असलेल्या बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्रावरून भापजचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र ढवळून काढला आहे. राजकीय गुन्हेगारीमुळे संवेदनशील झालेल्या बीडच्या परळी तालुक्यातील दौऱ्यात मात्र किरीट सोमय्यांना मुस्लिमांच्या रोषाला समोरं जाव लागलं.

किरीट सोमय्या परळी पोलिस ठाण्यात जात, तिथं बनावट जन्म-मृत्यू दाखल्यांप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. यासाठी तब्बल दोन तास ते पोलिस ठाण्यात तळ ठोकून होते. तिथून त्यांचा ताफा पुढं निघत असतानाच, त्यांना परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक व एक मिनार चौकात मुस्लिमांनी काळे झेंडे दाखवत, विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

भाजपचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या घुसखोर बांगलादेशींना बनावट जन्म प्रमाणपत्रप्रकरणी थेट परळीचे तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्यावरच आरोप केले. नायब तहसीलदार यांना कुठलाही अधिकार नसताना त्यांनी याबाबतीत आदेश काढला आहे. आता हे सगळे जन्म प्रमाणपत्र रद्द करावेत. परळी तहसील कार्यलायातून मंजूर असे भासवलेल्या या जन्म प्रमाणपत्रावर खोट्या सह्या असल्याची खळबळजनक माहिती देखील सोमय्या यांनी समोर आणली.

Bjp Kirit Somaiya
Beed BJP Office Murder : सक्रिय कार्यकर्त्यावर भाजप कार्यालयासमोरच कोयत्यानं सपासप वार; मंत्री बोर्डीकरांची दोन दिवसांपूर्वीच घेतली होती भेट

जन्म प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये नोटरी नाही, तसंच जागेचा पत्ता नसलेल्या माणसाला देखील जन्म प्रमाणपत्र देण्यात आला आहे. मी पोलिस (Police) अधिकाऱ्यांना याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याच्यामागे कोण कोण आहे याचीही चौकशी करावी लागलणार आहे. या प्रकरणात तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली.

Bjp Kirit Somaiya
Chandrakant Khaire Meet Uddhav Thackeray : पक्ष संकटात असताना वाद नको, म्हणून मी चार पाऊलं मागे! उद्धव ठाकरेंना त्रास होऊ देणार नाही..

294 जन्म प्रमाणपत्र हे तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांनी दिले आहेत. हे करताना नगरपालिकेच्या कुठलाच अधिकारी उपस्थित नव्हता. ज्यांच्याकडे हिंदुस्थान मधली कुठलीही कागदपत्र नसताना त्यांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. हे एक प्रकारे इथल्या लोकांवर अत्याचार आहे आणि आतंकवादाला प्रोत्साहन देण्यासारखा आहे, अशा घणाघात किरीट सोमय्या यांनी केला.

तहसीलदारांवर देखील कारवाईचे संकेत

तहसीलदार या प्रकरणात स्वतः तक्रारदार म्हणून समोर आले आहेतय. पण माझी त्याला देखील हरकत आहे. या सर्व प्रकारात तहसीलदार आणि नायब तहसीलदार हे सहभागी आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आज जरी त्यांनी तक्रार दाखल केली आणि या तक्रारीनंतर देखील तहसीलदारांवर आरोप सिद्ध झाल्यावर, त्यांच्यावर देखील कारवाई होणार आहे, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला.

सोमय्यांना दाखवले काळे झेंडे

या प्रकरणात मी जातीने लक्ष घालणार आहे. या प्रकरणात आधीच बीड येथे गुन्हा दाखल झाला आहे. परळी पोलिस ठाण्यात देखील गुन्हा दाखल होणार आहे. असे सांगून किरीट सोमय्या परळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी रवाना झाला. तिथं ते दोन तास ठाण मांडून होते. तेथून बाहेर पडल्यानंतर त्यांना व त्यांच्या ताफ्याला मुस्लिमांनी काळे झेंडे दाखवले.

पोलिसांचा उडाला गोंधळ

परळी शहरातील मुख्य रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि एक मिनार चौकात मुस्लिमांनी काळे झेंडे दाखवत किरीट सोमय्या यांच्या ताफ्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली. या गोंधळामुळे पोलिस प्रशासनावर चांगलाच ताण आला होता. परिस्थिती संयमाने हाताळत, किरीट सोमय्या यांचा ताफा सहीसलामत मार्गस्थ करून दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com