Shankarrao Gadakh Nevasa Election Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shankarrao Gadakh: शंकरराव गडाख नेवाशाच्या मैदानात 'मशाल' घेऊन उतरणार की, 'बॅट'!

Shankarrao Gadakh to Contest from Shiv SenaUBT or Krantikari Shetkari Party in Nevasa: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत नेवासा तालुक्यात गट आणि गटात महिलांसाठी सर्वाधिक आरक्षण पडले आहे.

Pradeep Pendhare

Panchayat Samiti Election Nevasa: नेवासे पंचायत समितीसाठी चौदा पैकी सात जागांवर महिलांचे आरक्षण निघाले, तर जिल्हा परिषदे करीता तालुक्यातील सात जागांकरीता सर्वाधिक पाच जागांवर महिलांचे आरक्षण निघाल्याने महायुती व महाविकास आघाडीकडून गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या अनेक संभाव्य उमेदवारांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

अनेक गण आणि गटांत महिलांचे आरक्षण निघाल्याने मातब्बर उमेदवारांना आपल्या पत्नींना पुढे करण्याची वेळ येणार असल्याचा बाका प्रसंग आला आहे. माजी आमदार शंकरराव गडाख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर आहे.

पण त्यांनी क्रांतिकारी शेतकरी पक्ष काढला होता. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत मशाल की, बॅट चिन्ह घेऊन लढणार याविषयी चर्चा आहे.

मागील निवडणुकीत माजी आमदार शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांच्या गटाच्या ताब्यात पंचायत समितीचा कारभार होता. चौदा पैकी बारा गणातील सदस्य गडाख गटाचे होते, तर भेंडे गणात माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे गटाचा, तर शिरसगाव गणात विद्यमान आमदार विठ्ठल लंघे गटाचा उमेदवार सदस्य होता. जिल्हा परिषदेच्या कुकाणे गटात आमदार लंघे, तर भेंडे गटात मुरकुटे गटाचा सदस्य होता. अन्य पाच गटांत माजी आमदार गडाख गटाचे उमेदवार निवडून आले होते.

मागील पंचायत समितीत पदाधिकारी असलेले सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार तसेच जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) अर्थ व पशुसंवर्धन सभापती राहिलेल्या सुनील गडाख यांच्या खरवंडी जिल्हा परिषद गटात सर्वसाधारण महिलाचे आरक्षण निघाल्याने अडचण झाली आहे. निवडणुकीत सध्या आमदार लंघे व माजी आमदार गडाख गट दोन्ही निवडणुका लढण्यासाठी सज्ज असल्याचे दिसते.

माजी आमदार मुरकुटे गट विधानसभा निवडणूक प्रमाणे बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडून लढणार याविषयी संभ्रम आहे. गडाखांचा गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाकडून लढणार की, क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या 'बॅट' चिन्हावर लढणार, याविषयी चर्चेला सुरुवात झाली आहे.

पंचायत समिती गण आरक्षण

बेल पिंपळगाव- अनुसूचित जमाती, सलाबतपूर - ओबीसी महिला, भानसहिवरे- अनुसूचित जाती, पाचेगाव- सर्वसाधारण महिला, भेंडा- सर्वसाधारण, मुकिंदपूर- अनुसूचित जाती महिला, सोनई- सर्वसाधारण महिला, घोडेगाव- सर्वसाधारण, चांदे- सर्वसाधारण, देडगाव- ओबीसी, कुकाणे - ना. मा. प्र. महिला, शिरजगाव- सर्वसाधारण महिला, खरवंडी - सर्वसाधारण, करजगाव- सर्वसाधारण महिला.

जिल्हा परिषद आरक्षण

सोनई- ना. मा. प्रवर्ग (महिला), खरवंडी- सर्वसाधारण (महिला), चांदे- सर्वसाधारण (महिला), बेलपिंपळगाव- सर्वसाधारण (महिला), भानसहिवरे- सर्वसाधारण (पुरुष), भेंडे- सर्वसाधारण (पुरुष), कुकाणे- सर्वसाधारण (महिला).

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT