Balasaheb Thorat Vs Amol Khatal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thorat Vs Amol Khatal : राखीव जागांमुळे समीकरणे बदलली; तरीही थोरात-खताळ-तांबेंमध्ये घमासान, विखे पितापुत्र संगमनेरच्या मैदानात पुन्हा उतरणार?

Balasaheb Thorat vs Amol Khatal in Sangamner ZP Election : संगमनेर पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 18 गणांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले असून, यामध्ये 9 जागा महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत.

Pradeep Pendhare

Ahilyanagar Zilla Parishad election : संगमनेर पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 18 गणांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये 9 जागा महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत. प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी अरुण उंडे व तहसीलदार धीरज मांजरे यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत पार पडली.

विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात अन् एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ पुन्हा एकदा एकमेकांना आजमावणार आहेत. यात कोणाची चरशी होते, अन् नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजित तांबे यांचे मामा थोरात यांना कसे बळ मिळते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. भाजप मंत्री राधाकृष्ण विखे आणि त्यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे पाटील संगमनेरमध्ये आता राजकीय अजेंडा राबवतात, याची देखील उत्सुकता असणार आहे.

याआधीच संगमनेर (Sangamner) पंचायत समितीच्या सभापती पदासाठीची आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली असून, हे पद अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून निर्माण झालेली उत्सुकता आणि तणाव आता काही, अंशी निवळला आहे. या आरक्षण सोडतीमुळे पंचायत समितीच्या सभागृहात यंदा महिलांचा ठसा स्पष्टपणे उमटणार आहे.

18 गणांपैकी 9 जागा महिला उमेदवारांसाठी राखीव असल्या कारणाने महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने ही निवडणूक (Election) महत्त्वाची ठरणार आहे. तथापि, अनेक राजकीय इच्छुकांसाठी ही सोडत ‘हिरमोड’ ठरली आहे. काही इच्छुकांनी आधीपासूनच तयारी सुरू केली होती, परंतु आरक्षणामुळे त्यांना थांबावे लागले आहे. त्यामुळे आता राजकीय पक्ष आणि स्थानिक नेत्यांनी नव्या चेहऱ्यांच्या शोधासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीत संगमनेर तालुक्यात महत्त्वाचे राजकीय समीकरण बदलताना दिसले. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची तालुक्यावर दीर्घकाळ एकहाती सत्ता होती. मात्र, त्यांचा आमदार अमोल खताळ यांच्याकडून पराभव झाला. या पार्श्वभूमीवर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका अधिकच चुरशीच्या होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. आरक्षण सोडतीनंतर उमेदवारांनी आपले गण व संभाव्य मतदारसंघ पाहून रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग येणार, हे निश्चित आहे.

संगमनेर पंचायत समिती गण निहाय आरक्षण

1. निमोण – नागरिकांचा मागास प्रवर्ग

2. समनापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग

3. तळेगाव – सर्वसाधारण

4. वडगाव पान –अनुसूचित जाती महिला

5. आश्वी बुद्रुक – सर्वसाधारण महिला

6. आश्वी खुर्द – सर्वसाधारण महिला

7. जोर्वे – सर्वसाधारण महिला

8. अंभोरे – सर्वसाधारण

9. घुलेवाडी – अनुसूचित जाती

10. गुंजाळवाडी – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

11. राजापूर – सर्वसाधारण

12. धांदरफळ बुद्रुक – सर्वसाधारण महिला

13. संगमनेर खुर्द – सर्वसाधारण महिला

14. चंदनापुरी – सर्वसाधारण

15. खंदरमाळवाडी – अनुसूचित जमाती

16. बोटा – अनुसूचित जमाती महिला

17. पिंपळगाव देपा – सर्वसाधारण

18. साकूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT