BJP vs Ajit Pawar NCP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP vs NCP Shrigonda : अजितदादांची सात जणांची 'टीम' Vs भाजप; श्रीगोंद्यात महायुतीत 'राडा' होणार?

Ahilyanagar Zilla Parishad & Panchayat Election: BJP vs Ajit Pawar NCP in Shrigonda : श्रीगोंदा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व सहा गटांमध्ये सोयीचे आरक्षण निघाल्याने नेत्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

Pradeep Pendhare

Shrigonda local elections : श्रीगोंदा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व सहा गटांमध्ये सोयीचे आरक्षण निघाल्याने नेत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. तीन गट खुले झाले, तर दोन गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहेत. काष्टी गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. पंचायत समितीच्या गणांचे आरक्षण देखील अनेकांच्या सोयीचे निघाले आहे.

मात्र श्रीगोंद्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सात जणांची टीम आणि भाजप आमदार विक्रम पाचपुते यांच्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राजकीय डावपेच अधिक रंगणार असल्याचे चित्र आहे. एकप्रकारे महायुतीत राडा होण्याची सर्वाधिक चिन्हं आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी (NCP) व भाजपमध्ये थेट लढत होणार आहे. भाजपची सूत्रे आमदार विक्रम पाचपुते यांच्या हाती राहणार आहेत, तर राष्ट्रवादीत सात नेत्यांची 'टीम' रणनीती आखणार आहे. त्यामुळे अपवाद वगळता सगळ्या जागांवर तुल्यबळ लढती रंगणार आहेत.

श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील बेलवंडी, येळपणे व कोळगाव हे तीन खुले झाले आहेत, तर आढळगाव व मांडवगण हे दोन गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहेत. बेलवंडी गटातील नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, अण्णासाहेब शेलार, उत्तम डाके, संदीप नागवडे आदींचा मार्ग मोकळा झाला आहे. येळपणे गटात प्रणोती जगताप, बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे, दादासाहेब वाखारे, विश्वास गुंजाळ, सतीश धावडे, संभाजी देवीकर, सचिन कातोरे आदींचा मार्ग मोकळा झाला आहे. कोळगाव गटातून दत्तात्रय पानसरे, दिनकर पंदरकर, हेमंत नलगे, पुरुषोत्तम लगड हे नशीब आजमावू शकतात.

आढळगाव गट पुन्हा एकदा महिलेसाठी राखीव झाल्याने पंचशिला रमेश गिरमकर, संध्या विजय शेंडे, दरेकर कुटुंबातील महिला उमेदवार पुढे येऊ शकतात. मांडवगण गटही पुन्हा महिलेसाठी राखीव झाल्याने सुवर्णा सचिन जगताप, वैजयंता बाबासाहेब भोस, सुनंदा टिळक भोस आदी नावे पुढे येऊ शकतात. काष्टी गटात साजन पाचपुते, राकेश पाचपुते, जितेंद्र मगर आदी रिंगणात उतरू शकतात.

दरम्यान, पंचायत समितीच्या गणांमध्ये काष्टी, बेलवंडी, पेडगाव, भानगाव हे चार गण खुले झाले आहेत, तर देवदैठण व पारगाव सुद्रीक हे दोन गण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहेत. कोळगाव व मांडवगण हे दोन गण नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत. हंगेवाडी गण नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. येळपणे गण अनुसूचित जातीसाठी, आढळगाव गण अनुसूचित जाती महिलेसाठी तर लिंपणगाव गण अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव झाला आहे.

श्रीगोंदा पंचायत समिती आरक्षण

देवदैठण - सर्वसाधारण (महिला)

येळपणे - अनुसूचित जाती

कोळगाव - नागरिकांचा मागासप्रवर्ग (महिला)

पारगाव सुद्रिक - सर्वसाधारण (महिला)

मांडवगण - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

भानगाव - सर्वसाधारण

आढळगाव - अनुसूचित जाती (महिला)

पेडगाव - सर्वसाधारण

बेलवंडी - सर्वसाधारण

हंगेवाडी - नागरिकांचा मागासप्रवर्ग

काष्टी - सर्वसाधारण

लिंपणगाव - अनुसूचित जमाती (महिला)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT