Shiv Sena Controversy: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत नवा वाद पेटला; संपर्कप्रमुख मोठा की जिल्हाप्रमुख ?

Uddhav Thackeray Shiv Sena dispute: नागपूर शहरातील उद्धव ठाकरे सेनेच्या दोन जिल्हाप्रमुख आणि तीन शहरप्रमुख आहेत. त्यांचे आपसात कधीच पटले नाही. एका जिल्हाप्रमुखाने बोलावलेल्या बैठकीला दुसरा जिल्हाप्रमुख जात नाही. विशेष म्हणजे नागपूरच्या दोन्ही जिल्हाप्रमुखांनी विधानसभेच्या निवडणुकी एकाच विधानसभा मतदारसंघावर दावा केला होता.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीनं नागपूर महापालिकेच्या निवडणुकीच चाचपणी केली जात आहे.महायुती झाल्यास किती जागा मागायच्या आणि स्वबळावर लढायची वेळ आल्यास किती जागांवर फोकस करायचा यावर सध्या चर्चा सुरू आहे. जिल्हाध्यक्षांना बैठका घेऊन तयारीचा आढावा घेण्याचे निर्देश संपर्कप्रमुखांनी दिले आहेत. मात्र, आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये संपर्कप्रमुख मोठा की जिल्हाप्रमुख असा वाद निर्माण झाला आहे. रविवारी उबाठाच्या बैठकीत यावरून चांगलीच गरमागरमी झाल्याचे पुढे आले आहे.

नागपूर शहरातील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सेनेच्या दोन जिल्हाप्रमुख आणि तीन शहरप्रमुख आहेत. त्यांचे आपसात कधीच पटले नाही. एका जिल्हाप्रमुखाने बोलावलेल्या बैठकीला दुसरा जिल्हाप्रमुख जात नाही. विशेष म्हणजे नागपूरच्या दोन्ही जिल्हाप्रमुखांनी विधानसभेच्या निवडणुकी एकाच विधानसभा मतदारसंघावर दावा केला होता. त्यावेळीसुद्धा मोठे मतभेद उफाळून आले होते.

दोघांची भांडणे बघून काही पदाधिकाऱ्यांना दुसराच मतदारसंघ मागावा अशी सूचना केली होती. ज्या दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघावर उद्धव सेनेने दावा केला होता ते काँग्रेसनेसुद्धा सोडण्यास नकार दिला होता. शेवटच्या लढाईत काँग्रेसने हात मारला. त्यामुळे उबाठातील पुढील संघर्ष टळला होता.

आता महापालिकेची निवडणूक तोंडवर आली आहे. दक्षिण नागपूर, दक्षिण-पश्चिम आणि मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात जिल्हाप्रमुख प्रमोद मानमोडे तर उर्वरित तीन मतदारसंघाचे किशोर कुमेरिया जिल्हाप्रमुख आहेत. कुमेरिया आणि मानमोडे दोन्ही जिल्हाप्रमुख दक्षिण नागपूरमध्येच राहतात.

Uddhav Thackeray
Nagpur News: धक्कादायक! एकाच पत्त्यावर दोनशे मतदारांची नावं; ZP निवडणुकीपूर्वीच नागपूरमधला आणखी एक मतदारसंघ सापडला वादात

रविवारी जिल्हाप्रमुख या नात्याने मानमोडे यांनी शिवसैनिकांची बैठक बोलावली होती. त्यांच्याकडे असलेल्या तीनही विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना या बैठकीला बोलावण्यात आले होते. संपर्कप्रमुख सतीश हरडे यांनीसुद्धा या बैठकीला हजेरी लावली. मात्र, पक्षप्रमुखांना कोणी अहवाल सोपवायचा यावरून मतभेद उफाळून आले होते.

Uddhav Thackeray
Sangli Politics: 'मविआ'साठी तीन कट्टर विरोधक नेत्यांचा पुढाकार; महायुतीवर भारी पडण्यासाठी पुण्यात गुप्त बैठक, 'प्लॅन' ठरला?

बूथप्रमुख शहरप्रमुखांना, शहर प्रमुख जिल्हाप्रमुखांना आणि जिल्हाप्रमुख संपर्कप्रमुखाच्या माध्यमातून आपला अहवाल पक्षप्रमुखांकडे सोपवतो. तशी यंत्रणा उद्धव ठाकरे शिवसेनेची आहे. असे असले तरी पक्षप्रमुखांना अहवाल कोणी सोपवायचा यावर संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांमध्ये मतभेद उफाळून आले होते. यावर शाब्दिक खडाखडी झाल्याचे समजते. मात्र, हा प्रकार गैरसमजातून झाल्याचा खुलासा करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com