Gram Panchayat Election Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Gram Panchayat Election: उपसरपंच पदासाठी इच्छुकांनी लावली आमदार, खासदारांपर्यंत 'फिल्डिंग' ?

Sarpanch : उपसरपंच पदासाठी अनेक गावात राजकारण तापले

Pradeep Pendhare

Ahmednagar News: नगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा धुरळा शांत झाला आहे. आता दिवाळी फराळ देखील उरकत आला असतानाच पुन्हा ग्रामपंचायतींमध्ये उपसरपंच निवडीवरून राजकारण तापू लागले आहे. उपसरपंचपदाची माळ आपल्या गटाच्या सदस्याच्या गळ्यात पडण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. ही निवड प्रक्रिया 21 ते 25 नोव्हेंबरच्या कालावधीत पार पडणार आहे.

नगर जिल्ह्यात 194 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला होता. यात 17 ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. उर्वरीत ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. आता 184 ग्रामपंचायतींमध्ये उपसरपंच पदासाठी निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

या निवडणुकीत सरपंचाला देखील मतदान करण्याचा अधिकार आहे. उपसरपंच पदासाठी आता या गावांमधील राजकारण तापू लागले आहे. काही इच्छुकांनी आमदार, खासदार आणि राजकीय पक्षातील प्रमुख नेत्यांपर्यंत निरोप आणले आहेत. त्यामुळे या निवडीत राजकीय रंग भरू लागला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी वर्ग दोनच्या राजपत्रित अधिकाऱ्यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. नायब तहसीलदार, सहायक गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, उपअधीक्षक भूमि अभिलेख, सहायक अभियंता, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांचा यात समावेश आहे. ग्रामपंचायतीसाठी सरपंच जनतेतून निवडून आला आहे. आता उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जाहीर केला आहे.

दरम्यान, सरपंचांना राज्य सरकारने काही अधिकार दिले आहेत. पहिले दोन वर्ष त्यांच्यावर अविश्वास ठराव आणता येणार नाही. त्यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचाची निवडणूक होईल. उपसरपंच निवडणुकीत सरपंच हे सदस्य म्हणून मतदान करणार आहेत. उपसरपंच निवडणुकीत दोन उमेदवारांना समान मते पडल्यास एक निर्णायक मत देण्याचा अधिकारी सरपंचांना असणार आहे.

दिवाळी फराळाआडून मोर्चेबांधणी अन्...

नगर जिल्ह्यात सर्वच राजकीय नेत्यांची दिवाळी फराळ रंगले आहेत. यानिमित्ताने नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्य आपपाल्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी जात आहे. यावेळी उपसरपंच पदासाठी इच्छुक असलेले नेत्याजवळ फिल्डिंग लावत आहेत.

राजकीय पदाधिकाऱ्यांना यासाठी पुढारपण देत आहे. काहींना शब्द मिळत आहे. तसे निरोप देखील जावू लागले आहेत. परंतु काहींची निराशा होत आहे. तरी संधी मिळते काय, याची चाचपणी केली जात आहे. काहींनी संधी मिळणार का, यासाठी ज्योतिषशास्त्राचा आधार घेत आहेत. काहीजण उपाय घेवून येत आहेत.

Edited by Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT