Namdev Jadhav: राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; जाधवांना काळे फासल्यानंतर विश्रामबाग पोलिसांकडून कारवाई

Pune News: सरकारी कामात अडथळा आणणे; तसेच धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती विश्रामबाग पोलिसांनी दिली.
Namdevrao Jadhav
Namdevrao Jadhav Sarkarnama

Pune: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आरोप करणाऱ्या नामदेव जाधव यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. जाधव यांनी पवारांवर सतत आरोप केल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या चेहऱ्याला काल (शनिवारी) काळं फासलं. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी सायंकाळी नवी पेठेतील पत्रकार भवनासमोर ही घटना घडली. त्यानंतर जाधव यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा ते पंधरा कार्यकर्त्यांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे; तसेच धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती विश्रामबाग पोलिसांनी दिली.

Namdevrao Jadhav
Abu Azmi News: 'अबू आझमी परत जा'; गुहामध्ये शेकडो तरुण रस्त्यावर...

जाधव यांना काळं फासल्यानंतर काही वेळ येथे तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये त्यांचा कार्यक्रम होता. मात्र या कार्यक्रमासाठी परवानगी नाकारली गेली होती. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यासाठी जाधव सायंकाळी सहाच्या सुमारास पत्रकार भवन येथे आले. तेथे ते माध्यमांशी बोलत होते.

पत्रकारांशी बोलत असताना अचानक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्याठिकाणी आले त्यांनी जाधव यांना काळं फासलं. त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांनी जाधव यांना धक्काबुक्की केल्याने काही काळ येथे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवून जाधव यांना मोटारीत बसवले. जाधव यांनी याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

कार्यकर्त्यांनी जाधव यांना धक्काबुक्की करून काळे फासले. या घटनेनंतर तेथे गोंधळ उडाला. त्या वेळी तेथे असलेल्या पोलिसांनी सुरक्षा कडे करून जाधव यांना मोटारीमध्ये बसवले. तेथून जाधव विश्रामबाग पोलीस ठाण्यात गेले. जाधव यांनी फिर्याद नोंदवली. जाधव यांच्या बरोबर असलेला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करून गणवेशावर शाई फेकण्यात आली

Namdevrao Jadhav
Deepak Kesarkar: आमदार घरीच बसणार? राऊतांचं भविष्य नेहमीचं खोटं ठरतं; केसरकरांनी डिवचलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com