Balasaheb Thorat Sarakrnama
उत्तर महाराष्ट्र

Nagar Lok Sabha Election : सुजय विखेंना उमेदवारी मिळण्याबाबतचा 'क्राइटेरिया' थोरातांनी सांगून टाकला

Pradeep Pendhare

Ahmednagar Lok Sabha Election News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे उमेदवार सुजय विखे (Sujay Vikhe) यांना पुन्हा उमेदवार मिळण्यामागचा 'क्राइटेरिया' भर सभेत सांगून खिल्ली उडवली. 'मोठ्याचं पोरं. भरपूर पैसा आहे. सत्तेची ताकद आहे म्हणून खासदार व्हायचयं. यापेक्षा कोणतीही गुणवत्ता त्यांच्याकडे नाही', असा सणसणीत टोला बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी लगावला आहे. Loksabha Election 2024

पाच वर्षाच्या खासदारकीच्या कार्यकाळात काय काम केले? किती फिरले? किती वेळा मतदारसंघात आले? कोणते प्रश्‍न सोडविले?, असे प्रश्न उपस्थित करून बाळासाहेब थोरातांनी तिसगांवकरांकडून उत्तरे मागितली. Ahmednagar Election News 

यावेळी बोलतांना थोरात म्हणाले, "त्यांनी खासदार म्हणून काहीच काम केले नाही. मोठ्याचं पोरगं आहे. पैसा भरपूर आहे. सत्तेची ताकद आहे, म्हणून खासदार व्हायचंय! यापेक्षा कोणतीही गुणवत्ता त्यांच्याकडे नाही, ही वस्तूस्थिती आहे". तुमच्या पुढे दोन उमेदवार आहेत. एकाकडे खुप धनसंपत्ती आहे. सत्ता आहे. तर, दुसरा आहे तो सर्वसामान्य कुटुंबातला कर्तृत्ववान उमेदवार आहे. गरीबाच्या पोराला संधी मिळणे सोपे नसते. मात्र नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी ती मिळविली आहे, असे थोरात यांनी सांगितले. latest News Maharashtra Politics

निर्यातबंदी गुजरात पुरतीच उठविली

एकीकडे निर्यात बंदी उठविली म्हणता, तर दुसरीकडे कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी रस्त्यावर आला आहेत. आंदोलने सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कांद्याची निर्यातबंदी फक्त गुजरात करता उठविली, आपल्याकरता नसल्याचे सांगत आमदार बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.Current News about Maharashtra Politics

यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांच्यासाठी तिसगाव (ता. पाथर्डी) येथे सभा झाली. या सभेत बाळासाहेब थोरातांनी भाजप उमेदवार खासदार सुजय विखेंवर जोरदार हल्ला चढवला. आमदार प्राजक्त तनपुरे, प्रताप ढाकणे, नसीर शेख, मुन्ना तांबोळी, शिवशंकर राजळे, रफीक शेख उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT