Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी माजी खासदार सुजय विखे यांना बारामतीमधून डिवचलं आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लक्षवेधी झाली. विखे पिता-पुत्रांचा 'विजय रथ' नीलेश लंकेंनी रोखला.
आता खासदार नीलेश लंके यांनी नगर दक्षिणमधून महाविकास आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार विधानसभा निवडणुकीतून निवडून आणायचे आहे, असा चंग बांधला आहे. माजी खासदार सुजय विखेंची कधी भेट होते का? यावर नीलेश लंके यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते फिरत्या आरोग्य रथाचं बारामती इथं लोकार्पण झालं. खासदार नीलेश लंके यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येणार असल्याचं भाकीत त्यांनी बारामतीतून वर्तवलं. जागा वाटपावरून कोणतीही बिघाडी महाविकास आघाडीत नसल्याचंही नीलेश लंके यांनी म्हटलं. माजी खासदार सुजय विखेंशी भेट होते का? यावर नीलेश लंकेंनी त्यांच्या स्टाईलमध्ये प्रतिक्रिया दिली.
नीलेश लंके यांनी माजी खासदार सुजय विखेंशी (Sujay Vikhe) भेट होते यावर बोलले की, "माझ्या राजकीय जीवनात त्यांची कधी भेट झाली नाही आणि होणार देखील नाही. नीलेश लंके ज्याच्याविरोधात निवडणूक लढवित असतो, त्याच्याशी हात मिळवणी कधीच करत नसतो". नीलेश लंके यांच्या या प्रतिक्रियामुळे विखे पिता-पुत्रांशी राजकीय संघर्ष कायम राहणार, असे दिसते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्यात काँग्रेसच्या सर्वाधिक जागा निवडून येतील आणि काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल, असं भाकीत वर्तवलं आहे. यावर नीलेश लंके म्हणाले, ''मविआ'चा मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला निश्चित होईल. त्यानुसार कार्यवाही होईल'. जागा वाटपातून महाविकास आघाडीत बिघाडी होताना दिसते आहे. यावर लंके म्हणाले, 'महाविकास आघाडीत प्रमुख पक्षांचे नेते एका विचारावर चालणार आहेत. त्यामुळे कोणतीही बिघाडी होणार नाही. तर्कवितर्क होत असतात. त्याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे नाही'.
शरद पवारांकडे अजित पवार गटातील आमदार पुन्हा येत आहेत. यावर बोलण्या इतपत मी मोठा नाही. मी शरद पवारांचा कार्यकर्ता आहे. त्यावर बोलणं चुकीचं ठरेल, असं सांगून बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी तिसरी आघाडीवर, आज तरी चित्र दिसत आहे. उद्या काय, असेल सांगू शकत नाही. राजकारण बदल असतं, बघत राहू, असेही नीलेश लंके यांनी म्हटलं. कांदा आणि दुधाला भाव मिळाला पाहिजे. दुधाला 40 रुपये प्रति लिटर भाव देण्याची मागणी आहे. त्यावर महायुती सरकारने प्रतिसाद दिलेला नाही. परंतु राज्यात येणारं सरकार महाविकास आघाडीचेच असणार आहे. त्यावेळी यावर सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असं विश्वास नीलेश लंकेंनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.