Ahmednagar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Advocate Couple Death : राहुरी पोलिसांची 'सिंघम' स्टाईल; आरोपींची भर रस्त्यातून काढली धिंड

Singham Style : वकील आढाव दांपत्य हत्याकांडाचा तपास सीआयडीकडे

Pradeep Pendhare

Ahmednagar Crime News :

राहुरीतील वकील आढाव दांपत्याच्या त्याकांडाची तीव्रता कमी करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. हत्याकांडातील पाच संशयित आरोपींना पोलिसांनी राहुरी शहरातून पायी फिरवले. पोलिसांची ही सिंघम स्टाईल पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती.

पोलिसांना या आरोपींकडून ॲड. मनीषा आढाव यांची पर्स सापडली. आता या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण म्हणजेच सीआयडी करणार आहे.

राहुरी येथील ॲड. राजाराम आणि त्यांच्या पत्नी अॅड. मनीषा आढाव यांची 25 जानेवारीला दुपारी अपहरण करून रात्री निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेत सराईत आरोपी किरण नानाभाऊ दुशिंग ऊर्फ दत्तात्रय (रा. उंबरे), सागर साहेबराव खांदे ऊर्फ भैया (रा. येवले आखाडा), शुभम संजीत महाडिक (रा. मानोरी), हर्षल दत्तात्रय ढोकणे (रा. उंबरे), बबन सुनील मोरे (रा. उंबरे) या पाच जणांना राहुरी पोलिसांनी अटक केली आहे.

अटक केलेला किरण हा सराईत गुन्हेगार (Crime) आहे. त्याने आणि त्याच्या पाच साथीदारांनी कट करून आढाव दांपत्याचे हत्याकांड केल्याचा राहुरी पोलिसांच्या प्राथमिक तपासात आढळले आहे. आढाव दांपत्याच्या हत्येची तीव्रता कमी करण्यासाठी हा तपास राज्य सरकारने सीआयडीकडे (CID) वर्ग केला आहे.

तत्पूर्वी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींची पोलिसांनी राहुरीतून पायी धिंड काढली. राहुरी पोलिस ठाण्यापासून शनिचौक-नवीपेठ नगर-मनमाड रोडने मुळा नदीच्या पुलावर या आरोपींना पायी फिरवले. दरम्यान, ॲड. मनीषा आढाव यांची पर्स आरोपींनी पुलावरून फेकली होती. ती पर्स पोलिसांना सापडली. यानंतर आरोपींना पुन्हा नगर-मनमाड रोडने जुनी पेठ-शिवाजी चौक-शनिचौक-पोलीस ठाणे या मार्गाने पायी आणण्यात आले.

पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, समाधान फडोळ, धर्मराज पाटील तसेच राहुरी पोलिसांचे मोठा बंदोबस्त यावेळी होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

फडणवीसांच्या भूमिकेकडे लक्ष

आढाव वकील दांपत्याचे कोर्टातून अपहरण करून हत्या झाल्याने त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रातील वकिलांमध्ये उमटले आहेत. हा हत्याकांडात वेगवेगळी माहिती पसरत असल्याने वकिलांबरोबर समाजमनाच्या भावना देखील तीव्र होत आहेत.

वकिलांनी वकील संरक्षण अॅक्टची मागणी लावून धरली आहे. यासाठी कोर्टाच्या कामकाजापासून 3 फेब्रुवारीपर्यंत अलिप्त राहत धरणे आंदोलन सुरू केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) 2 फेब्रुवारीला वकील शिष्टमंडळासोबत वकील संरक्षण अॅक्टच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर वकील संघटना आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहेत.

(Edited by Avinash Chandane)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT