Sanjay Gaikwad : छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून हाकला ! शिंदे गटातील संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान

Chhagan Bhujbal : आपल्याला ओबीसी समाजाच्या हितापेक्षा काहीही महत्त्वाचे नसल्याचा दावा भुजबळांनी केला होता.
Sanjay Gaikwad, Chhagan Bhujbal
Sanjay Gaikwad, Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असणारे बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी छगन भुजबळ यांच्याबाबत एक विधान केले आहे. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून कमरेत लाथ घालून बाहेर काढा, असे वादग्रस्त विधान केले आहे. दरम्यान, छगन भुजबळांवरील या विधानामुळे आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने तयार केलेल्या नव्या जीआरवरून ओबीसी नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर येत आहेत. या वादाची ठिणगी आता मंत्रिमंडळात देखील पडली आहे. मंत्री छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) ओबीसींसाठी घेतलेल्या भूमिकेवरून मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याची आक्रमक मागणी बुलढाणा शिवसेनेचे आमदार गायकवाडांनी केली. दरम्यान, त्यांच्या या मागणीमुळे महायुतीत नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Sanjay Gaikwad, Chhagan Bhujbal
Shambhuraj Desai : पाटणमधून शंभूराज देसाई फिक्स, तरी भाजपची बांधणी! महायुतीत चाललंय तरी काय ?

संजय गायकवाडांनी (Sanjay Gaikwad), 'भुजबळांना मंत्रिमंडळातून कमरेत लाथ घालून बाहेर काढा,' असे विधान केले आहे. 'आता कुणाचा बापही मराठा आरक्षण रोखू शकणार नाही,' असे म्हणत गायकवाडांनी भुजबळांवर निशाणा साधला. गायकवाडांच्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले असून मराठा आरक्षणाबाबत काढण्यात आलेल्या जीआरवरून त्याचे पडसाद आता राज्याच्या मंत्रिमंडळातही पडले आहेत.

Sanjay Gaikwad, Chhagan Bhujbal
Hemant Soren News: 1300 किलोमीटरचा प्रवास, तब्बल 40 तास बेपत्ता...; 'असा' दिला सोरेन यांनी ईडीला गुंगारा!

वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीही भुजबळ यांनी राजीनामा देण्याची मागणी केली होती. मंत्रिमंडळात कुणी ऐकत नसेल तर भुजबळांनी सरकारमध्ये राहून लढण्यापेक्षा मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बाहेर पडून लढावे, असा सल्ला आंबेडकरांनी दिला होता. राजीनामा दिला नाही तर त्यांची भूमिका दुटप्पी असल्याचे समजावे, असा आरोपही त्यांनी केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, आपल्याला ओबीसी समाजाच्या हितापेक्षा काहीही महत्त्वाचे नसल्याचा दावा भुजबळांनी केला होता. ओबीसींच्या मुद्द्यावरून मुद्द्यावरून भुजबळ एकटे पडले का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे.

प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरेंनीही मराठा आरक्षणाचे समर्थन केले आहे. तर मराठा आरक्षणासंदर्भात भुजबळांची भूमिका ही वैयक्तिक असून, पक्षाची नाही, असे म्हणत प्रफुल्ल पटेलांनी हात वर केले आहेत. त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटही भुजबळांच्या विरोधात उभा ठाकला असल्याची चर्चा यानिमित्ताने होऊ लागली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Sanjay Gaikwad, Chhagan Bhujbal
Pankaj Deshmukh : पुणे ग्रामीण पोलिसांत आता 'देशमुखी थाट'! पंकज देशमुख नवे एसपी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com