BRS News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Death Threat News: 'बीआरएस' नेत्याच्या मुलाला तलवारी दाखवत जिवे मारण्याची धमकी; राजकारणात खळबळ

Death Threat to Praveen Shelar: या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Pradeep Pendhare

Ahmednagar News: नगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याचे 'बीआरएस'चे नेते घनश्याम शेलार यांच्या मुलाला घरी जाऊन शिवीगाळ करत तलवारीचा धाक दाखवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रवीण शेलार यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अनिल वसंत सोमवंशी (रा. शिरसगाव बोडखा) याला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

या प्रकाराची श्रीगोंदे तालुक्यात सध्या मोठी चर्चा रंगली आहे. पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी केल्याचा राग अनिल सोमवंशीला होता. यातून त्याने प्रवीण याला घरी जाऊन तलवारीने धमकावले. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अनिल सोमवंशी हा शिरसगाव बोडखा येथे त्याच्या पत्नीसोबत राहतो. त्याचा पत्नीबरोबर घरगुती वाद झाले. 'बीआरएस'चे नेते घनश्याम शेलार यांचा मुलगा प्रवीण याने मध्यस्थी करत हे वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. प्रवीणने मध्यस्थी केल्याचा राग अनिलला होता. त्याने 16 नोव्हेंबरला सायंकाळी साडेचार वाजता शेलार यांच्या वडळी येथील घरी आला. त्यावेळी त्याने नशा केली होती. पती-पत्नीच्या वादात मध्ये का पडता, असे म्हणून शिवीगाळ केली.

अनिल याने तिथे चांगलाच धिंगाणा घातला. दमदाटी, शिवीगाळ करण्याबरोबरच त्याने तलावर बाहेर काढली. या प्रकारामुळे मोठा गोंधळ उडाला. तलवार दाखवत जिवे मारून टाकेल, अशी धमकी देण्यास सुरुवात केली. आमच्या भांडणात परत मध्ये आलास, तर तलवारीने कापून टाकीन, अशी धमकी दिली. प्रवीण याने या प्रकाराची फिर्याद श्रीगोंदे पोलिसांकडे केली. दाखल गुन्ह्यात पोलिसांनी अनिल सोमवंशी याला अटक केली आहे.

Edited by Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT