Nilesh Lanke, Sharad Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke News : 'तुतारी'ने करेक्ट कार्यक्रम केला, आमदार लंकेंना मिटकरींनी डिवचले

Ahmednagar South Loksabha Constituency : शरद पवार यांच्याशी आमदार लंकेंची आजची भेट पक्ष प्रवेश आणि लोकसभेच्या उमेदवारीसाठी होती, असे आडाखे बांधले गेले होते.

Pradeep Pendhare

Ahmednagar News : आमदार नीलेश लंके यांनी आपण शरद पवार यांच्या विचारधारा एकनिष्ठ असल्याचे सांगून त्यांची पुणे येथील पक्ष कार्यालयात भेट घेतली. पवार यांच्याशी आमदार लंकेंची आजची भेट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश आणि लोकसभेच्या उमेदवारी निश्चितीसाठी होती, असे आडाखे बांधले गेले होते.

परंतु, दोघांनी समोरासमोर येऊन यावर भाष्य टाळून शरद पवार आणि आमदार लंके यांनी पुन्हा एकदा अजितदादांसह विरोधकांना कात्रजचा घाट दाखवल्याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी यावरून आमदार नीलेश लंकेंना टोला लगावला आहे. 'तुतारी गटाने करेक्ट कार्यक्रम गेला', असे आमदार मिटकरी यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. आमदार लंके यांची राजकीय हालचाली देखील तसे संकेत देत आहेत. परंतु शरद पवार आणि आमदार लंके हे समोरासमोर येऊन देखील राजकीय खेळ ताणून धरत आहेत. त्यामुळे नेमके काय, असेच काहीसे वातावरण झाले आहे.

आमदार लंकेंच्या या हालचालींमुळे अजितदादांनी देखील त्यांना चांगलेच फटकारले आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी देखील महायुतीचा धर्म पाळत आम्ही भाजप उमेदवाराचे काम करणार असल्याचे सांगून आमदार लंकेंच्या परतीचे दोर कापले आहेत. आता आमदार अमोल मिटकरी यांनी देखील आमदार नीलेश लंके यांना खोचक टोमणा लगावला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार मिटकरी यांनी त्यांच्या 'एक्स' खात्यावर या सर्व घडामोडीवर खोचक टोमणा मारणारी पोस्ट शेअर केली आहे. 'गेल्या आठ महिन्यात पारनेर विधानसभा मतदारसंघात विकास कामांसाठी ६३७ कोटी रुपये आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात एक हजार कोटी रुपये अजितदादांकडून घेऊन गेलेले आमदार नीलेश लंके साहेबांचा तुतारी गटाने करेक्ट कार्यक्रम केला', अशी पोस्ट शेअर केली. तसेच पोस्ट खाली हॅशटॅग म्हणून 'दिल्या खरी सुखी राहा', असे म्हटले आहे.

आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी तीन दिवसापूर्वी देखील आमदार लंकेंच्या संभाव्य शरद पवार गटाच्या पक्षप्रवेशावर पोस्ट शेअर केली होती. यामध्ये आमदार मिटकरी यांनी आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता त्यांना चिमटा काढला आहे. त्यांना बालमित्र मंडळाचे अध्यक्ष म्हणून डिवचले आहे. 'लंके साहेब तुमच्या खांद्यावर बंदुक ठेवली जात आहे. दादांची साथ सोडू नका. तुम्हाला इतरांपेक्षा उज्वल राजकीय भविष्य आहे. तुतारी गटाला लोकसभा लढवायची एवढीच हौस असेल, तर बालमित्र मंडळाच्या अध्यक्षाला मैदानात उतरवून बघा म्हणावं. तु्म्ही एक सामान्य आहात म्हणून विनंती करतो', असे त्यात म्हटले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT