Pune BJP : पुणे भाजपमध्ये बंडाळी? मोहोळांच्या रॅलीत नाराजीनाट्याचे 'दर्शन'

Murlidhar Mohol : 'कार्यक्रमाबद्दलचा निरोप रात्री उशिरा दिल्याने ते उपस्थित राहू शकले नसावेत. पण भाजपमध्ये उमेदवारीवरून कोणतीही नाराज नाहीत.'
Jagdish Mulik, Murlidhar Mohol
Jagdish Mulik, Murlidhar MoholSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपमधून अनेक दिग्गज मंडळी इच्छुक होते. आता भाजपने लोकसभा उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत पुण्यातून माजी महापौर मुरलीधर मोहोळांना संधी दिली आहे. मोहोळांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच पुणे भाजपमध्ये नाराजीनाट्य रंगल्याचे दिसून आले आहे. उमेदवारी जाहीर होताच मोहोळांनी काढलेल्या पहिल्याच रॅलीत इतर इच्छुकांनी दांडी मारली. परिणामी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपमध्ये बंडाळी होणार काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. (Pune BJP)

पुणे लोकसभेसाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारीवर शिक्कामोर्तब होताच मोहोळांनी गुरुवारी देवदर्शनासाठी रॅली काढली होती. या रॅलीत पुणे भाजपचे अनेक पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली. मात्र पुण्यातून लढण्याची तयारी केलेल्या इतर इच्छुकांनी मात्र पाठ फिरवली. त्यांची रॅलीतील अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Jagdish Mulik, Murlidhar Mohol
Vijay Shivtare News : मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर शिवतारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, येत्या दोन दिवसांत...

पुण्यातून (Pune Lok Sabha) उमेदवारी मिळतात मोहोळांनी गुरुवारी सकाळी ग्रामदैवत कसबा गणपती येथे दर्शन घेऊन त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडला. त्यानंतर दिवसभरात शहरातील विविध स्मारकांना भेटी देऊन महापुरुषांना अभिवादनही केले. या दर्शनासाठी काढलेल्या रॅलीत भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate), राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, शिवसेनेचे (शिंदे गट) शहर प्रमुख नाना भानगिरे, अजय भोसले, रिपाइंचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, परशुराम वाडेकर, शिवसंग्रामचे भरत लगड, विष्णू कसबे, संजय आल्हाट, लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, गणेश बिडकर, हेमंत रासने आदी उपस्थित होते.

मोहोळ यांनी रॅली काढली असली तरी त्यापूर्वी त्यांनी सर्व इच्छुक उमेदवारांना फोन करून संपर्क साधला होता. शहराध्यक्षांकडून रॅलीला उपस्थित राहण्यासाठी संबंधितांना निरोपही पाठवला होता. पण जगदीश मुळीक (Jagdish Mulik), संजय काकडे यांच्यासह त्यांचे समर्थकांनी या रॅलीकडे पाठ फिरवली. त्यामुळे मोहोळ यांच्या उमेदवारीवरून पक्षात नाराजी असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर शहराध्यक्ष घाटे म्हणाले, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहोळांनी लगेच इतर इच्छुकांशी संपर्क साधून त्यांचे आभार मानले. त्यांना कार्यक्रमाबद्दलचा निरोप रात्री उशिरा दिल्याने ते उपस्थित राहू शकले नसावेत. पण भाजपमध्ये उमेदवारीवरून कोणतीही नाराज नाहीत, असा विश्वासही घाटेंनी व्यक्त केला.

(Edited by Sunil Dhumal)

Jagdish Mulik, Murlidhar Mohol
Mamata Banerjee : ममता बॅनर्जींच्या डोक्याला गंभीर दुखापत; रक्तस्त्राव झाल्याने रुग्णालयात दाखल!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com