Radhakrishna Vikhepatil, Shivaji Kardile Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivaji Kardile : नगरचा दुधवाला मैदानात; मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवाजी कर्डिलेंना मुंबईत बोलावलं

Invitation to Shivaji Kardile for meeting on milk price issue : दूध दरावर तोडगा काढण्यासाठी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीचं निमंत्रण नगरचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना देण्यात आलं आहे.

Pradeep Pendhare

Milk Price Protest : दूध उत्पादक ते सरपंच, पुढे अपक्ष आमदार, मंत्रीपद आता भाजपचे नगर जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांपैकी एक माजी आमदार जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले हे आता दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुढे आले आहेत.

मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूध दरवाढीसंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीला शिवाजी कर्डिले यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. राज्य सरकारकडून याबाबतचे निमंत्रण मिळाल्यानंतर शिवाजी कर्डिले यांनी 'दुधवालाच दूध उत्पादकांना न्याय देणार', अशी मिश्किल टिप्पणी करत हे निमंत्रण स्वीकारत मुंबईकडे रवाना झाले आहेत.

राज्यातील दूध प्रश्नाबाबत मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठक होत आहे. भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे व माजी खासदार सुजय विखे या बैठकीला उपस्थित राहणार असून, या बैठकीचे निमंत्रण शिवाजी कर्डिले यांना देण्यात आलं आहे.

बैठकीचे निमंत्रण येताच शिवाजी कर्डिले यांनी नगर जिल्ह्यातील दूध उत्पादक, डेअरी आणि दूध प्लांट चालकांची बैठक घेतली. या निमंत्रणाची माहिती देत त्यावर शिवाजी कर्डिले यांनी मिश्लिक टिप्पणी केली. "दुधाबाबतचे प्रश्न मला माहीत आहेत. ते मी बैठकीत मांडणार असून सरसकट दूध उत्पादक शेतकऱ्यांना दहा रुपयाचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करा, अशी मागणी करणार, तसेच जाचक अटी आणि केंद्र सरकारने घालून दिलेली अट रद्द करण्याची मागणी करणार असल्याचं कर्डिले यांनी सांगितलं.

शिवाजी कर्डिले यांनी आयोजित केलेल्या बैठकीला जिल्ह्याभरातून दूध (Milk) उत्पादक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्याकडे दुग्धविकास खाते आहे. मंत्री विखे आणि कर्डिले यांचे मैत्रीपर्व संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे. यातच दूध दरवाढीचे आंदोलन नगर जिल्ह्यात चिघळले आहे.

हे आंदोलन एक दुधवाला हाताळू शकतो, यातून माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना बैठकीला निमंत्रण देण्यात आलं आहे. यातच शिवाजी कर्डिले नगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत. दूध उत्पादक शेतकरी यांचे सर्वाधिक संबंध बँकेशी येतो. त्यामुळे मंत्री विखेंनी शिवाजी कर्डिले यांना मैदानात उतरवून आंदोलन रोखण्यासाठी हा डाव खेळला आहे.

शिवाजी कर्डिले यांनी नगर जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या बैठकीत समस्या जाणून घेतल्या. "सरकारने 5 टक्के अनुदान जानेवारी महिन्यातच जाहीर केले होते. मात्र जाचक अटी-शर्तीमुळे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहचू शकले नाही. फक्त 40 टक्केच दूध उत्पादकांना त्याचा लाभ झाला. पण उर्वरित 60 टक्के दूध शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहोचली नाही. यातून सरकारवर रोष निर्माण झाला. दोन लिटर दूध उत्पादकांपासून तर थेट 100 लिटर दूध उत्पादकांपर्यंत सर्वांनाच अनुदानाची मदत होणे गरजेचे आहे. मुंबईत दूध प्रश्नाबाबत बैठकीत ही सविस्तर बाजू मांडू", असे शिवाजी कर्डिले यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT