Hum Do Hamare Baarah  sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

AIMIM News : अन्नू कपूरचा 'हम दो, हमारे बारह' चित्रपट वादात; 'एमआयएम'चा तीव्र आक्षेप; केला 'हा' आरोप

Pradeep Pendhare

Ahmednagar News : अभिनेता अन्नू कपूर (Annu Kapoor) अभिनय असलेल्या 'हम दो, हमारे बारह' (Hum Do Hamare Baarah) या चित्रपटावरून वाद सुरू झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रदर्शनावर 'एमआयएम' आक्रमक झाली आहे. इस्लाम धर्मविरोधी हा चित्रपट असून, यातून इस्लाम धर्माला आणि मुस्लिमांना बदनाम केले जात असल्याचा आरोप करत 'एमआयएम' आक्रमक झाली आहे.

'एमआयएम'चे (AIMIM) नगर जिल्हाध्यक्ष डाॅ. पवरेज अशरफी यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री, गृहमंत्री, अल्पसंख्याक आयोगाला पत्र पाठवले आहे. तसेच 'एमआयएम'चे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांचे देखील लक्ष वेधले आहे. इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी या चित्रपटावर नाराजी व्यक्त केली असून, याबाबत केंद्र सरकारचे लक्ष वेधणार आहेत, अशी माहिती डाॅ. परवेश अशरफी यांनी दिली. 'हम दो हमारे बाराह' चित्रपट समाज माध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहे. यातून भारतातील मुस्लिमांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कुराणमधील माहिती घेऊन लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांनी ती या चित्रपटामध्ये अर्धवट आणि चुकीच्या पद्धतीने मांडली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'द केरल स्टोरी' (The Kerala Story) या चित्रपटामधून देखील मुस्लिमांना बदनाम केले गेले. आता 'हम दो, हमारे बारह', या चित्रपटातून इस्लाम धर्मामध्ये स्त्रियांना कोणतेच स्थान नसल्याचे दाखवले गेले आहे. त्यांना फक्त मुले जन्माला घालण्यासाठी असल्याचे दाखवले गेले. पूर्ण देशात एक विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनी इस्लाम धर्माला आणि भारतीय मुस्लिमांना बदनाम करण्याची सुपारी घेतल्याचे दिसते. या विचारसरणीच्या लोकांना देशात दंगल घडवायची असल्याचे दिसते. AIMIM opposes the film Hum Do Hamare Baarah

इस्लाम आणि मुस्लिमान विरोधी चित्रपट प्रदर्शित करून देशातील अशांतता निर्माण करायचा हेतू असल्याचे दिसते. यामुळे 'हम दो, हमारे बारह' या चित्रपटावर त्वरित बंदी घालावी. या चित्रपटाला परवानगी देणारे सेन्सोर बोर्ड, दिग्दर्शक, लेखक, अभिनेता तसेच इस्लाम धर्म आणि भारतीय मुस्लिमान यांना बदनाम करण्याचा षड्यंत्र रचत आहे. त्यांच्यावर कारवाईची 'एमआयएम'चे जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT