Nashik Teacher Constituency Election : निवडणूक शिक्षक मतदारसंघाची, आमदार कोण होणार शिक्षक की, संस्थाचालक..?

Nashik Teacher Election : शिक्षक लोकशाही आघाडी बंडखोरीच्या सावटाखाली आहे. ही बंडखोरी रोखण्याचे आव्हान शिक्षक लोकशाही आघाडीसमोर आहे. यातच या मतदारसंघात संस्थाचालकांनी शिरकाव केला आहे. त्यामुळे निवडणुकीची उत्सुकता वाढली आहे.
Nashik Teacher Constituency
Nashik Teacher Constituencysarkarnama

Nagar News : नाशिक शिक्षक विधानपरिषदेच्या मतदारसंघाची (Nashik Teacher Constituency Election) पुन्हा निवडणूक जाहीर झाली. यामुळे शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीत शिक्षकांमधून आमदार होणार की, संस्थाचालक, याची उत्सुकता आहे. शिक्षक लोकशाही आघाडीने (TDF) उमेदवार जाहीर केला असला, तरी बडे संस्थानिक देखील तयारीत आहेत.

नाशिक (Nashik) विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मागील 2018 च्या निवडणुकीत शिक्षक लोकशाही आघाडीच्या (TDF) उमेदवाराचा पराभव होऊन शिक्षण संस्थाचालक किशोर दराडे आमदार झाले होते. या निवडणुकीत टीडीएफने उमेदवार जाहीर केला आहे. असे असले तरी, टीडीएपमध्ये सेवानिवृत्त आणि कार्यरत शिक्षक, असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे टीडीएफ (TDF) बंडखोरीच्या सावटाखाली आहे. ही बंडखोरी रोखण्याचे आव्हान टीडीएफसमोर आहे. यातच या मतदारसंघात संस्थाचालकांनी शिरकाव केला आहे. त्यामुळे निवडणुकीची (Election) उत्सुकता वाढली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nashik Teacher Constituency
Raksha Khadse News : केळी उत्पादक घटवणार रक्षा खडसे यांचे मताधिक्य?

शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे आमदार किशोर दराडे, नाशिक (Nashik) जिल्हा मराठा संस्थेचे विश्वस्त संदीप गुळवे यांच्यासह याच विभागात पदवीधरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून निवडणूक लढलेल्या शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील (नाशिक), अहमदनगरचे अर्जुन कोकाटे, भाऊसाहेब कचरे, निशांत रंधे (धुळे), आर. डी. निकम (नाशिक), एन. डी. नांद्रे (नंदुरबार), नीलिमा आहिरे (नाशिक) अशी दहा इच्छुकांनी शिक्षक लोकशाही आघाडीकडे (TDF) शिर्डीमध्ये (Shirdi) मुलाखती देऊन उमेदवारी मागितली होती. टीडीएफने भाऊसाहेब कचरे यांना उमेदवारी जाहीर केली. कचरे यांना उमेदवारी जाहीर होताच, टीडीएफमध्ये बंडखोरी सुरू झाली. Curious whether MLAs will become teachers in the Nashik Teachers Legislative Council or administrators

संस्थाचालकांमुळे शिक्षकांमध्ये धडधड

गेल्या निवडणुकीतील आमदार किशोर दराडे टीडीएफची (TDF) विचारधारा मानणारे नव्हते आणि शिक्षकही नव्हते. त्यांचा शिक्षक चळवळीशी कुठलाही संबंध नव्हता. त्यामुळे या विभागातील शिक्षक आणि शिक्षक कार्यकर्त्यांनी यावेळी शिक्षकांचा प्रतिनिधी हा संस्थाचालक नव्हे तर, शिक्षक कार्यकर्ताच असावा, असे म्हणणे आहे. आमदार किशोर दराडे यांच्यासह अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे आणि विखे परिवारातील डाॅ. राजेंद्र विखे या मतदारसंघातून इच्छुक आहेत. या संस्थानिकांच्या एन्ट्रीमुळे शिक्षकांची धडधड वाढली आहे.

'टीडीएफ'चा पाच वेळा आमदार

नाशिक शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात टीडीएफचे प्राबल्य आहे. 1988 पासून या मतदारसंघात सहा पैकी पाचवेळी टीडीएफने दिलेला उमेदवार आमदार झाला आहे. हा मतदारसंघ तसा मोठा आहे. नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश होतो. गेल्या निवडणुकीत अनेक शिक्षक उमेदवारांनी उमेदवारी केल्याने टीडीएफच्या मतांची विभागणी झाली. परिणामी टीडीएफचा उमेदवाराचा पराभव झाला. यावेळी देखील इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे बंडखोरीची शक्यता अधिक आहे.

Nashik Teacher Constituency
Chhagan Bhujbal News : अमित शाहांची पसंती तरी भुजबळांना का नाही मिळाली उमेदवारी? मोठं कारण आलं समोर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com