Nashik Shivsena News: शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. संदर्भात सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी एक दिलाने काम करावे. पक्षाचा प्रभाव वाढविण्यासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे सचिव राम रेपाळे यांचा पक्षाच्या नाशिक शाखेतर्फे सत्कार करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मार्ग मोकळा केला आहे. पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीत आहेत.
नाशिक शहरात सचिव रेपाळे यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी आगामी निवडणुकीसाठी तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड करताना आणि संघटनात्मक कामकाजाला प्राधान्य देण्याची मागणी केली.
नवनियुक्त सचिव राम रेपाळे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या संकल्पनेवर आधारित शिवसेना उभी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यासाठी प्रचंड परिश्रम घेतले आहे. आपल्या पक्षाला जनमानसात मोठे स्थान आहे. विचार करता वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून सगळ्यांनी गट बाजूला तिलांजली द्यावी असे सांगितले.
यावेळी बहुतांशी सदस्यांनी निवडणूक ही प्राधान्याने व पक्षाने पूर्ण ताकतीनिशी लढवावी अशी मागणी केली. शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष महायुतीचा घटपक्ष म्हणून सत्तेत आहे. महायुतीत शिवसेनेला स्थान मिळाले पाहिजे. असे स्थान मिळाले नाही तरीही आपल्या पक्ष महापालिकेवर स्वबळावर भगवा फडकवेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी पक्षाचे उपनेते अजय बोरस्ते, माजी खासदार हेमंत गोडसे, संपर्क प्रमुख जयंत साठे, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, भाऊलाल तांबडे, संजय दुसाने, सह संपर्कप्रमुख राजेंद्र सोनवणे, ज्येष्ठ नगरसेवक मामा ठाकरे, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, महिला आघाडीच्या राजश्री अहिरराव, माजी नगरसेविका सुवर्ण मटाले, मंगला भास्कर यांसह विविध पदाधिकाऱ्यांनी महापालिका निवडणुकी संदर्भात विविध सूचना केल्या.
---------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.