Malegaon BJP News: भारतीय जनता पक्षाने आज राज्यातील 78 पैकी 58 जिल्हाध्यक्षांच्या नियुक्ती जाहीर केल्या. उर्वरित 20 जिल्हाध्यक्ष अंतर्गत स्पर्धा आणि राजकीय रस्सीखेच यामुळे लटकल्या आहेत. या नियुक्त्या करताना पक्षाने सदस्य नोंदणी हा निकष लावला आहे.
भाजपच्या(BJP) महाराष्ट्र प्रदेश निवडणूक समितीचे प्रमुख आमदार चैनसुख संचेती यांनी 58 जिल्हा अध्यक्ष जाहीर केले. अंतर्गत राजकीय हेवेदावे आणि लॉबिंग मुळे 20 नियुक्त्या वेटिंगवर आहेत. यासंदर्भात पालकमंत्र्यांपासून तर अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा या नियुक्त्यांमध्ये हितसंबंध असल्याचे बोलले जाते. रखडलेल्या नियुक्त्या त्यामुळे चर्चेचा विषय आहेत.
नाशिक शहरात पक्षाने 2.09 लाख सदस्य नोंदणी केली आहे. निकषानुसार हे उद्दिष्ट शंभर टक्के साध्य झाल्याने विद्यमान पदाधिकाऱ्यांना फेरनियुक्तीची अपेक्षा होती. मात्र त्यांचा जीव आता टांगणीला लागला आहे. मालेगाव शहरात मात्र भाजपने विद्यमान जिल्हा अध्यक्ष निलेश कचवे यांना पुन्हा संधी दिली आहे. कचवे यांचे स्पर्धक आणि भाजप उद्योग आघाडीचे उपाध्यक्ष नितीन पोकळे यांची संधी हुकली.
वस्तुत: मालेगाव शहराची भाजप म्हणजे "ओसाड गावची पाटीलकी" अशी स्थिती आहे. या पक्षाचा शहर व तालुक्यात एकही सरपंच अथवा मोठ्या सत्ता स्थानावर पदाधिकारी नाही. त्याचे मुख्य कारण तालुक्यावर मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांचे एक खांबी नेतृत्व आहे. मंत्री भुसे यांनी आपली सत्ता, राजकारणावरील पकड आणि लोकांमधील स्थान याचा पुरेपूर वापर करून भाजपची कोंडी केली आहे.
युती म्हणून मंत्री भुसे यांनी भाजपच्या एकाही कार्यकर्त्याला कुठेच संधी मिळणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. त्यामुळे भाजप विधानसभा निवडणुकीत भुसे यांच्या विरोधात एक वटला होता. पदाधिकारी सुनील गायकवाड यांनी बंड करून अपक्ष उमेदवार बंडूकाका बच्छाव यांचा प्रचार केला. त्यामुळे युती धर्म म्हणून भाजपने गायकवाड यांना बाहेरचा रस्ता दाखवला.
सुनील गायकवाड यांना पक्षातून काढल्याने भाजपचा प्रबळ नेता त्या बाहेर गेला. सध्याचे राजकीय चित्र पाहता दादा भुसे मालेगाव महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यामध्ये भाजपची पुन्हा एकदा कोंडी करणार. त्याला पर्याय म्हणून काँग्रेसचे प्रसाद हिरे आणि डॉ तुषार शेवाळे या दोन मोठ्या नेत्यांना भाजपने प्रवेश दिला.
भारतीय जनता पक्ष सध्या मालेगाव आणि नाशिक येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. अशा स्थितीत मंत्री भुसे यांना आव्हान देण्यासाठी भाजपला स्वबळावर निवडणुकीची तयारी करावी लागेल. त्यासाठी सध्या त्यांना प्रसाद हिरे आणि डॉक्टर तुषार शेवाळे हे कितपत उपयोगी पडतात हे भविष्यात स्पष्ट होईल. सुनील गायकवाड यांच्या परतीचा मार्ग देखील खुला आहे. त्यामुळे भुसे यांना आव्हान देण्यासाठी भाजप कोणती रणनीती स्वीकारतो हे जिल्हा अध्यक्षांच्या फेरनियुक्तीतून संदेश देण्याचा प्रयत्न झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.