Ahilyanagar District Bank Election : अहिल्यानगर जिल्हा बँकेत जाण्याची किंवा संजीवनीला जिंकविण्याची मला कोणतीही हौस नव्हती. मात्र आर्थिक अडचणीत सापडलेल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याला मदत व्हावी, या एकमेव उद्देशाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज हयात असते, तर जिल्हा बँकेची निवडणूक झालीच नसती, असे स्पष्ट मत अगस्ती कारखान्याचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांनी व्यक्त केले.
जिल्हा सहकारी बँकेच्या (DCC Bank) निवडणुकीत विजयानंतर माजी आमदार वैभवराव पिचड आणि संजीवनी शिंदे-गायकर यांचा अकोले येथे सत्कार करण्यात आला होता. यावेळी सीताराम पाटील गायकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे होते.
सीताराम गायकर म्हणाले, "अकोले तालुका आणि पिचड कुटुंबाने मला सलग तीस वर्षे जिल्हा बँकेवर काम करण्याची संधी दिली. (कै.) भाऊसाहेब हांडे यांनीही तीस वर्षे बँकेवर काम केले. जिल्हा बँकेच्या माध्यमातून तालुक्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी (Farmer) अनेक कामे करता आली. महिला बचतगट आणि अगस्ती कारखान्याला बँकेची मोठी मदत झाली. त्यामुळे यंदाची निवडणूक अत्यंत अटळ होती."
यंदाच्या निवडणुकीत अत्यंत वाईट प्रथा आल्याचे सांगत गायकर यांनी नाराजी व्यक्त केली. आज अजितदादा असते, तर जिल्हा बँकेची निवडणूक झालीच नसती, असा दावाही त्यांनी केला. संजीवनीला मिळालेल्या मतांबाबतही त्यांनी अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाल्याची खंत व्यक्त केली.
माजी आमदार वैभवराव पिचड यांनी तिकिटाच्या वाटपाचा संदर्भ देत सांगितले की, सोसायटी मतदारसंघातून मी, कैलास वाकचौरे, रावसाहेब वाकचौरे आणि संजीवनी शिंदे निवडणूक लढविण्यास तयार होतो. मात्र पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मला अनुसूचित मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची सूचना केली. त्यानुसार निवडणुकीची रणनीती बदलली. संजीवनी शिंदे यांच्यासाठी सोसायटी मतदारसंघातून माघार घेण्यास सांगितले आणि त्यानुसार निवडणूक लढविली. संजीवनी पिचड यांनी मतदारांचे आभार मानले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.