Ahilyanagar DCC Bank Election : बिनविरोधचा डाव आम्ही उधळला! लंके-ढाकणेंचा विखे-थोरातांवर हल्लाबोल; जिल्हा बँकेच्या विभाजनाचीही मागणी

Nilesh Lanke and Pratap Dhakane allege political manoeuvring in Ahilyanagar DCC Bank elections. Shiv Sena leaders demand bank division : दुष्काळाचे कारण पुढे करून कारखानदारांचे वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचा खासदार नीलेश लंके यांचा आरोप; शिंदेंच्या शिवसेनेच्या काकडेंनी उपस्थित केला उत्तर-दक्षिण भेदभावाचा मुद्दा.
Nilesh Lanke and Pratap Dhakane
Nilesh Lanke and Pratap DhakaneSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ahilyanagar District Cooperative Bank election controversy : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या बिनविरोधची चर्चा कुठे फिस्कटली, यावर बँकेत निवडणूक आलेले संचालक खासदार नीलेश लंके, राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे, शिवसेनेचे अॅड. शिवाजीराव काकडे व हर्षदा काकडे यांनी मोठा दावा केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि एकनाथ शिंदे शिवसेनेचे प्रत्येकी दोन उमेदवार घ्या, असा आमचा प्रस्ताव होता. आणि बँकेत सोयरेधारऱ्यांच्या माध्यमातून कारखानदारांचेच वर्चस्व राहावे, यासाठी बिनविरोधाची चर्चा काही जागांवर फिस्कटून लावली, असा लंके अन् ढाकणे यांनी दावा करत विखे पाटील-थोरात यांच्या एक्स्प्रेसबाबत खळबळ उडवून दिली. दरम्यान, शिवसेनेने जिल्हा बँकेच्या विभाजनाची मागणी करत वादाच्या नवीन मुद्यांना फोडणी दिली.

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke), राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे, शिवसेना नेते अॅड. शिवाजीराव काकडे आणि हर्षदा काकडे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. जिल्हा सहकारी बँकेत एकटाच निवडून आलो असलो, तरी सगळ्यांना पुरून उरेल असे सांगत नीलेश लंकेंनी निशाणा साधला.

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेवर (DCC Bank) उत्तरतेचा ताबा राहावा, बँक शेतकऱ्यांची आहे, असे सांगतात आणि बँकेंच्या पैशाचा ठराविक 12 कारखानदारांना वापर करता यावा, यासाठी दुष्काळाचे मुद्दा पुढे करत, बिनविरोधाचा घाट घातला. जिल्हा बँकेचा फक्त उत्तरेसाठी वापर होत असून, दक्षिण भागाचा केवळ वापर केला जात आहे, असा गंभीर आरोप खासदार लंकेंनी केला.

Nilesh Lanke and Pratap Dhakane
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : विखेंच्या शुभेच्छा, लंकेंचा टायगरवाला दम! कॉलर उडवत म्हणाले, 'जो टायगर होता है, वो अकेला आता है'; जिल्हा बँकेत दोघे आमनेसामने

आता आम्ही बँकेत नियमबाह्य काम होऊ देणार नसून, 12 साखर कारखानदारांनी नियमाची मोडतोड करून 2850 कोटीचे कर्ज घेतले आहे. राहुरी कारखाना चालवायला घेतल्यावर हातउसणे पैसे घेतात, तसे जिल्हा बँकेतून 300 कोटी रुपये घेतले. बँक शेतकऱ्याची आहे म्हणता आणि कारखानदारांना पोसण्यासाठी वाट्टेल त्या बाबी करून सगेसोयरे बँकेत आणता, असा घणाघात खासदार लंकेंनी केला.

Nilesh Lanke and Pratap Dhakane
Ahilyanagar DCC Bank Election : राम शिंदेंचा मंत्री विखे पाटलांना अप्रत्यक्ष टोला; जिल्हा बँकेच्या बिनविरोधावरून नवा पेच?

बँकेची निवडणूक यांना बिनविरोध करायची नव्हती. दुष्काळाचा ड्रामा करून, बिनविरोधचा डाव आखला होता. बिनविरोधासाठी आमचा विरोध नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि एकनाथ शिंदे शिवसेनेचे प्रत्येकी दोन उमेदवार घ्या, अशी आमची मागणी होती. सगेसोयऱ्यांच्या राजकारणाविरोधात शेवटी रिंगणात उतरलो. यामुळे वीस वर्षांनंतर तरी जिल्हा बँकेच्या सभासदांना निवडणूक कळली, असे खासदार नीलेश लंके यांनी म्हटले.

कर्ज वसुलीचा पाठपुरावा करणार : प्रताप ढाकणे

घेतलेल्या कर्जाचे पाप झाकण्यासाठीच दुसऱ्या कोणाला बँकेत येऊ द्यायचे नव्हते. पण आता जिल्हा बँकेतील चुकीच्या कामाला विरोध करणार आहोत. नियमबाह्य घेतलेले कर्जाची वसुली ही आमची पहिली मागणी असणार आहे. जिल्हा बँकेतील बोगस नोकर भरतीची फाईल कुठे आहे, याचा शोध घेऊन कारवाईची मागणी करणार आहे. खासदार लंके बँकेत गेल्याने आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करणार आहोत. लंके खासदार झाल्यापासून अजूनही काहींना झोपा येईनात, असा टोला यावेळी प्रताप ढाकणे यांनी लगावला.

मतदारांना धमक्या, प्रशासनाचा वापर

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत प्रचंड पैशाचा वापर झाला. मतदारांवर दबाव टाकण्यात आला. धमक्या देण्यात आल्या. मतदारावर मतदान करताना पाळत ठेवण्यात आली. प्रशासनाचाही वापर केला गेला. शिवाय उत्तरेत सर्वाधिक मतदान आहे. तेच ते लोक बँकेत राजकारण करून, शेतकऱ्यांची बँक म्हणतात, पण आपल्या कारखान्यासाठी वापर करतात. अनेक मतदारांना दबावापोटी इच्छा असूनही आम्हाला मतदान करता आले नाही, जर मतदारांना मोकळ्या मताने मतदान करू दिले असते तर निकालाचे चित्र वेगळे असते, असा दावा खासदार लंकेंनी केला.

जिल्हा बँकेच्या विभाजनाची मागणी

शिवसेनेचे अॅड. शिवाजीराव काकडे यांनी जिल्हा सहकारी बँकेला ठराविक कारखानदार मक्तेदारी समजून सत्ता मिळण्यासाठी सोयरे-धायरे व सर्वच बाबीचा वापर करतात. यंदा आम्ही विस्थापित लोकांसाठी निवडणूक लढवली. संगमनेर, कोपरगावात सर्वाधिक मते होती. आम्हाला तेथे कसलाही आधार नव्हता. दाबदडपशाही केली तराही आम्हाला एकूण मताच्या 45 टक्के मते मिळाली. निवडणुका लढवायला, मैदान म्हणून दक्षिणेचा वापर करतात. पण जेव्हा निधी द्यायची वेळ येते तेव्हा बँक, असो की अन्य बाब सगळे पैसे उत्तरेत नेतात. विस्थापित, सामान्य लोकांनी बँकेत येऊ नये म्हणून हे लोक प्रयत्नशील असतात. जिल्हा बँकेत दक्षिणेला कधी न्याय मिळाला नाही. त्यामुळे जिल्हा बँकेचे विभाजन केले पाहिजे, अशी त्यांनी मागणी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.