Nashik News : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल असून ठिकठिकाणी शोकसभा होत आहेत. अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी येवला व नाशिक येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या शोकसभेस राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे स्व.अजितदादा पवार यांचा अस्थिकलश सोबत घेऊन येणार आहे. हा अस्थिकलश येवला व नाशिक येथील शोकसभेच्या स्थळी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी १०.३० वाजता येवला शहरातील माऊली लॉन्स येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता नाशिक शहरातील महाकवी कालिदास कलामंदिर येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोकसभेस स्व.अजितदादा पवार यांचे अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
या शोकसभेस प्रमुख मंत्री, खासदार, आमदार व विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते विविध सामाजिक संस्था आणि संघटनांचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तरी या शोकसभेत स्व.अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात सर्वपक्षीय नेते पदाधिकारी व सर्व नागरिकांनी या शोकसभेस उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्व. अजित पवार यांचे नाशिक जिल्ह्याशी खास ऋणानुबंध होते. अजित पवार यांना त्यांच्या राजकीय वाटचालीत नाशिक जिल्ह्याने नेहमी साथ दिली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे सर्वाधिक आमदार नाशिक जिल्ह्यात आहेत. सर्वाधिक तब्बल सात आमदार नाशिक जिल्ह्यातील आहे. अजित पवार यांचेही नाशिक जिल्ह्यावर तेवढेच प्रेम होते. त्यांच्या अनेक आठवणी नाशिकमध्ये आहेत.
नाशिककरांनी दादांना साथ दिल्याने दादांनी त्याची परतफेड करताना नाशिक जिल्ह्यातील तब्बल तीन आमदारांना कॅबिनेट मंत्री केलं. आमदार माणिकराव कोकाटे यांना अजित पवार यांनी कृषी खाते देऊन त्यांचे मंत्रीपदाचे स्वप्न पूर्ण केले. तसेच नरहरी झिरवाळ यांना अन्न व औषध प्रशासन मंत्री केलं. छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा मंत्री केलं. नाशिक जिल्ह्याच्या झोळीत दादांनी तब्बल तीन मंत्रीपदे टाकली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.