Ajit Pawar Death News in Marathi Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar Death : नाशिकमध्ये भाजप, शिवसेनेचा गटनेता ठरला; अजितदादांच्या निधनामुळे राष्ट्रवादी दुःखात, निवड अद्याप नाही

Nashik Municipal Corporation : नाशिकमध्ये आता राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचाच गटनेता ठरणे बाकी आहे. मित्र पक्ष असलेल्या भाजप व शिवसेनेने आपला गटनेता निवडला आहे. विरोधी पक्षांच्या गटनेत्यांचीही निवड करण्यात आली आहे.

Ganesh Sonawane

Nashik Politics : महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. नाशिकच्या महापौर पदासाठी ६ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. नाशिकमध्ये मनपा निवडणुकीत भाजप स्वबळावर तर महायुतीमधील घटक पक्ष असलेली शिवसेना व राष्ट्रवादी दोघे एकत्र लढले. यात भाजपने ७२ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळे महापौर भाजपचाच होणार हे स्पष्ट आहे. महिला सर्वसाधरण प्रवर्गासाठी महापौर पद आरक्षित झाल्याने महिला महापौर होणार आहे.

दरम्यान राष्ट्रवादी वगळता अन्य पक्षात गटनेता नियुक्तीसाठी वेगवान हालचाली झाल्या असून भाजप गटनेतेपदी अॅड. श्याम बडोदे यांची तर शिवसेना शिंदे गटाच्या गटनेतेपदी अजय बोरस्ते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी(अजित पवार) गटनेतेपदासाठी बुधवारीच (दि. २८) बैठक घेण्यात येणार होती. मात्र पक्षाचे अध्यक्ष तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने बैठक रद्द झाली.

दरम्यान राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक हे अद्याप दुःखात असून धक्क्यातून सावरलेले नाही. त्यामुळे अद्याप राष्ट्रवादीचा गटनेता ठरवण्यात आलेला नाही. उद्धव सेनेने देखील महापालिकेच्या गटनेतेपदी केशव पोरजे यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचाच गटनेता ठरणे बाकी आहे.

भाजप गटनेतेपदी अॅड. श्याम बडोदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक ३० मधून बडोदे हे सलग दोनदा निवडून आलेले आहेत. तर शिवसेना शिंदे गटातही गटनेतेपदासाठी अजय बोरस्ते, विलास शिंदे, प्रवीण तिदमे व हर्षदा गायकर या चार जणांमध्ये स्पर्धा होती. त्यात अजय बोरस्ते यांनी बाजी मारली आहे. आज बोरस्ते यांची विभागीय आयुक्तांकडे गटनेता म्हणून नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.

शिवसेना (उबाठा) महापालिकेच्या गटनेतेपदी केशव पोरजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक २२ मधून उबाठाचा संपूर्ण पॅनल निवडून आला. त्यात पोरजे यांच्याकडे गटनेतेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. प्रभाग क्रमांक १४ मध्ये काँग्रेसचे तीन नगरसेवक निवडून आले आहे. सलग तीनदा निवडून आलेले सुफी जिन यांची काँग्रेसचे गटनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी विभागीय आयुक्तांकडे गटनेतेपदाची नियुक्ती केली.

तर मनसेकडून एकमेव मयूरी अंकुश पवार या निवडून आल्या असल्याने त्याच गटनेतेपदी राहतील. त्यांनी स्वतंत्र नोंदणी केली. विभागीय आयुक्तांकडे पक्षाचे गटनेते म्हणून नोंदणी झाल्यानंतर निवडणुकीच्या काळात नगरसेवकांना व्हीप बजावण्याचे अधिकार गटनेत्यांना राहील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT