Hiraman Khoskar And Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Hiraman Khoskar : काँग्रेस आमदार खोसकरांवरील अजित पवारांच्या मेहेरबानीचे रहस्य काय?

Hiraman Khoskar And Ajit Pawar : काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांना सत्ताधाऱ्यांपेक्षाही अधिकचा निधी मिळाला आहे. अजित पवार नाशिक इगतपुरीमधील काँग्रेसच्या या आमदारावर मेहेरबान का झाले आहेत, याची चर्चा आहे.

Sampat Devgire

Hiraman Khoskar News : विधिमंडळाचे अधिवेशन विविध कारणांनी गाजले. यातील मुख्य विषय आहे, पुरवणी मागण्याची मंजुरी! राज्याच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पातील मागण्या मंजूर करण्यात आल्या. यामध्ये सत्ताधारी पक्षाला भरभरून निधी मिळाल्याचा आरोप होतो आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारांवर निधीचा पाऊस पडला आहे.

यामध्ये अगदी सत्ताधारी भाजपच्या (BJP) आमदारांवर देखील फारशी मेहेर नजर झाली नसल्याची टिका होत आहे. त्यात विरोधी पक्षांची गत काय झाली असेल? हे वेगळे सांगणे नको. मात्र या सर्व चर्चेत विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर अपवाद ठरले आहेत. आमदार खोसकर यांच्या इगतपुरी मतदार संघासाठी घोटी येथे ग्रामीण रुग्णालयाचा विस्तार होणार आहे. त्यात तीस खाटांचे हे रुग्णालय 100 खाटांचे करण्यात येईल. या कामासाठी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून 85 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

याशिवाय कोटी शहरातील भुयारी गटारींसाठी दोन कोटी निधी मंजूर झाला. याच शहरात बस स्थानक बांधण्यासाठी नऊ कोटींचा निधी मिळाला आहे. एका झटक्यात 96 कोटींचा निधी आमदार खोसकर यांच्या पदरात पडला आहे. या अधिवेशनात काँग्रेसचे (Congress) माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार यांच्यावर पुरवणी मागण्यात भेदभाव केल्याचा आरोप केला. विरोधी पक्षांच्या आमदारांना डावलण्यात आल्याची टिका झाली होती. त्यात विरोधी पक्षाच्या आमदार खोसकर यांना एव्हढा निधी मिळणे, ही बाब चर्चेचा विषय ठरली आहे.

आमदार खोसकर यांना मिळालेल्या निधीची चर्चा होण्याची अनेक कारणे आहेत. आमदार खोसकर काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. मात्र त्यांचा वावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये अधिक असतो, असे बोलले जाते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक जिल्ह्यातील आमदारांचा उल्लेख करताना हिरामण खोसकर हे देखील आमचेच आमदार आहेत, असे विधान केले होते.

आमदार खोसकर यांच्या सत्ताधारी पक्षातील नेत्यांशी जवळीकीमुळे अनेकदा ते चर्चेत राहिले आहेत. विधिमंडळाच्या याच अधिवेशनात नुकतीच विधान परिषदेची निवडणूक झाली. या सर्व घडामोडींमध्येच आमदार खोसकर यांना अर्थमंत्री अजित पवार अति प्रसन्न झाले आहेत. त्यामुळे खोसकर यांना मिळालेल्या 96 कोटीच्या निधीची विशेष चर्चा होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT