Bharti Pawar Vs Bhaskar Bhagre : लोकसभेत पराभूत झाल्यानंतरही भारती पवार पदर खोचून मतदारसंघात सक्रिय; भास्कर भगरेंना आव्हान!

Dindori Lok Sabha Constituency Politics : दिंडोरी मतदार संघातील राजकारण आगामी काळातही चांगलेच तापणार आहे.
Dr. Bharti Pawar- MP Bhaskar Bhagare
Dr. Bharti Pawar- MP Bhaskar BhagareSarkarnama
Published on
Updated on

BJP Vs NCP News: कांद्याच्या प्रश्नावर आणि निर्यात बंदी मुळे लोकसभा निवडणुकीचे गणित बिघडले. त्याचा फटका भाजपला बसल्याचे दिसून आले आहे. मात्र या विषयावर पराभूत डॉ भारती पवार यांनी ठाम भूमिका घेतली आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे कामकाज करण्यासाठी चाचपडत आहेत. अशा स्थितीत पराभूत भाजपच्या डॉ पवार मात्र पुन्हा एकदा कमरेला पदर खोचून दिंडोरी मतदार संघातील प्रश्नांवर सक्रिय झाल्या आहेत.

त्यांनी अप्रत्यक्षरीत्या आपल्या विरोधकांना आव्हानच दिले आहे. कांदा प्रश्नावर विरोधकांनी जे राजकारण केले, ते योग्य नव्हते. केवळ कांदा प्रश्नामुळे मतदार संघातील साडेनऊ तालुक्यांचा विकास होणार असेल, तर विरोधकांनी तो करून दाखवावा. असे आव्हान डॉ पवार यांनी महाविकास आघाडीला दिले आहे.

डॉ भारती पवार(Bharti Pawar) यांच्या भूमिकेमुळे पराभवानंतर त्या पुन्हा सक्रिय होणार असे संकेत मिळाले आहे. त्यामुळे दिंडोरी मतदार संघातील राजकारण आगामी काळातही चांगलेच तापणार आहे.या संदर्भात विद्यमान खासदार भास्कर भगरे यांना देखील सक्रिय रहावे लागेल, असे सध्याचे चित्र आहे.

Dr. Bharti Pawar- MP Bhaskar Bhagare
Dr Bharti Pawar Politics : डॉ.भारती पवारांनी घेतला विरोधकांचा समाचार, हे आहे कारण...!

डॉ पवार यांच्या कारकीर्दीत मतदार संघात मंजूर झालेल्या विकास कामांबाबत त्या सक्रिय पाठपुरावा करणार आहेत. आचारसंहितेमुळे यातील महत्त्वाच्या कामांची गती थांबली होती. त्या मंजूर झालेल्या कामांना लागलेला ब्रेक थांबवून त्यांना गती देण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे.

मतदारसंघासाठी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यावर त्यांचा भर असेल. दिंडोरी मतदार संघातील मतदारांच्या अडचणींबाबत त्या आपल्या संपर्क कार्यालयातून प्रश्नांचे निरसन करणार आहेत. त्यांच्या कार्यकर्दीत मंजूर झालेल्या विकास कामांचा पाठपुरावा करून ती पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

मुंबई आग्रा महामार्गावर दहावा मैल, आंबेहिल, जऊळके दिंडोरी आणि चांदवड येथे चार उड्डाणपूल बांधण्याची घोषणा त्यांनी केली होती. या कामांना मंजुरी मिळाली आहे. लवकरच त्याचे भूमिपूजन होईल.

पेठ तालुक्यातील सावळ घाट आणि कोटंबे या दोन्ही घाटातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी रस्त्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी सुमारे ७५ कोटींचा निधी यापूर्वीच मंजूर झाला आहे. या कामासाठी वन विभागाची जमीन अधिग्रहण व परवानगी प्रलंबित आहे.

Dr. Bharti Pawar- MP Bhaskar Bhagare
Dr. Rahul Aher: आमदार राहुल आहेर यांना चांदवडकरांनी दाखवला हिसका...

हा अडथळा देखील लवकरच दूर करून भूमिपूजन केले जाईल, असे त्या म्हणाल्या. एकंदरच पराभवानंतर देखील भाजपच्या माजी खासदार डॉ पवार पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे दिंडोरी मतदार संघात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र पाहायला मिळेल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com