Eknath Khadse & Ajit Pawar
Eknath Khadse & Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadse : दादा मीडियाचे लाडके, त्यामुळेच झाली ‘मीडिया ट्रायल’

सरकारनामा ब्युरो

Eknath Khadse On Ajit Pawar : अजितदादा पवार हे माध्यमांचे आवडते आहेत. त्यामुळेच ते दिसले नाही कि, माध्यमांत अस्वस्थता वाढते. नॉट रिचेबलच्या बातम्या येतात. कदाचीत त्यामुळेच आज त्यांच्या भाजप प्रवेशाची ‘मिडीया ट्रायल’ करण्यात आली असावी, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे म्हणाले. (Eknath Khadse comments on Media news on NCP leader Ajit Pawar)

आज दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) पक्षाच्या आमदारांसह भारतीय जनता पक्षासोबत (BJP) जाणार असल्याच्या बातम्या डीजीटल माध्यमांत झळकल्या. त्यामुळे मोठी खळबळ उडाली. या बातम्या तथ्यहीन असल्याचे स्वतः अजित पवार यांना सांगावे लागले. त्यावर एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आपली प्रतिक्रीया दिली.

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे चाळीस आमदारासह भारतीय जनता पक्षासोबत जाणार अशा बातम्या सकाळपासूनच इलेक्ट्रॉनिक मिडीयात झळकत होत्या. त्यामुळे कार्यकर्त्यांत खळबळ उडाली. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्या भागातील आमदारांकडे त्याची चौकशी करीत होते. आमदारांचाही गोंधळ उडावा एव्हढा कॉन्फीडन्स मिडीयाचे रिपोर्टर दाखवत होते.

याबाबतची जोरदार चर्चा सुरू होती. अनेकांचा त्यातून गोंधळ उडाला. याबाबत राष्ट्रवादी कॉंगेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, यात काहीही तथ्य नाही. अजित पवार यांनीच पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत स्वत: जाहिर केले आहे.

स्वतः अजित पवार तसेच अन्य नेत्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण केल्यानंतरही या बातम्या थांबण्याचे नाव घेत नव्हती. मात्र वस्तुतः हा विषय संपला आहे. अजित पवार यांच्यावर माध्यमांचे विशेष प्रेम आहे. माध्यमकर्मींच्या ते आवडीचे आहेत. त्यामुळे जरा कुठे दिसले नाहीत कि, ‘नॉट रिचेबल’ असल्याच्या बातम्या होतात.

तसे प्रेम कधी नाथाभाऊंवर असल्याचे कधी दिसले नाही, कि, ‘नॉटरिचेबल’ आहेत. असे सांगितले जाते. अजित पवार यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशाची ही ‘मिडीया ट्रायल’ होती. आता हा प्रश्‍न संपला आहे, अजित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच राहणार आहेत, ते कोठेही जाणार नाहीत हे त्यांनीच स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT