Nashik APMC Election: एकानेही माघार न घेतल्याने नेत्यांची झोप उडाली!

Market Committee Election: बारा दिवसांत एकाही इच्छुकाने माघार न घेतल्याने शेवटच्या दोन दिवसांची प्रतिक्षा
Devidas Pingle & Shivaji Chumbhale
Devidas Pingle & Shivaji ChumbhaleSarkarnama

Nashik APMC News: नाशिक बाजार समिती निवडणूक होणार रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. त्याला कारण म्हणजे पॅनेलमध्ये उमेदवारीसाठी इतरांची माघारी व्हावी लागेल. कोणीही माघार घेण्यास तयार नाही. नेत्यांनी प्रयत्न केल्यास उमेदवारी कोणाला, अशी विचारणा होते. त्यामुळे गेल्या बारा दिवसांत एकाचीही माघार होत नसल्याने उच्छुक अडचणीत, पॅनेलचे नेते गोंधळात अशी स्थिती आहे. (All candidates firm on candidature, no one ready for withdrawl)

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी खासदार देविदास पिंगळे (Devidas Pingle) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) पॅनेल होणार आहे. त्यांचा प्रचार देखील तयार सुरु झाला आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे (Shivsena) शिवाजी चुंभळे (Shivaji Chumbhale) यांनी भारतीय जनता पक्षाचे (BJP) दिनकर पाटील यांसह पॅनेल करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे १३२ पैकी छत्तीस जणांना उमेदवारीची अपेक्षा आहे. त्यात माघार घेण्याची मानसिकता कोणाचीच नाही.

Devidas Pingle & Shivaji Chumbhale
ZP News: कपिल सिब्बलही `त्या`चे जि.प. सदस्यत्व वाचवू शकले नाही!

नाशिक कृषी बाजार समितीची निवडणूक चांगलीच रंगतदार होणार असल्याचे चित्र दिसत आहे. छाननीनंतरच्या बारा दिवसांत एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतलेला नाही. गुरुवारी अर्ज माघारीचा अंतीम दिवस आहे. त्यामुळे कोण, कोणत्या गटातून माघारी घेईल वा घ्यायला लावले जाईल याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

येथील निवडणुकीत आजी-माजी खासदारच नव्हे, तर महाविकास आघाडी व भाजप शिवसेना (शिंदे गट) यांच्यात थेट लढत होणार आहे. छाननीत १३७ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. अर्ज माघारी घेण्याची मुदत गुरूवारपर्यंत असल्याने त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

Devidas Pingle & Shivaji Chumbhale
Shocking News : प्रशासनाला सुबुद्धीसाठी शेतकरी संघटना करणार यज्ञयाग!

पॅनलनिर्मिती माघारीनंतरच?

नाशिक बाजारसमितीवर आपली सत्ता आणण्यासाठी दोन्ही गटांकडुन जोरदार प्रयत्न सुरू आहेत. परंतू दोन्ही गटांनी आपले पॅनल तयार केलेले नाही. अर्ज मागे घेण्याची मुदत गुरूवारपर्यंत असून, त्यानंतरच पॅनल निर्मितीला वेग येणार आहे. विशेषत: दोन्ही बाजूंचे नेते एकमेकांच्या इच्छुकांवर डोळा ठेऊन आहेत. त्यामुळे पॅनल निर्मितीबाबत दोन्ही गट अद्याप तरी शांत आहेत. दरम्यान, माघारीच्या मुदतीपूर्वी शेवटच्या दोन दिवसांत माघारीसाठी अर्ज सादर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com