Sharad Pawar- Anil Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Anil Patil Politics : मंत्री अनिल पाटील यांना शरद पवार गटाने घेरले!

Assembly Election 2024 Is Not Easy : अजित पवार गटाचे मंत्री असलेल्या अनिल पाटील यांची येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार पक्षाकडून राजकीय नाकेबंदी करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी पाच इच्छुकांनी पाटील यांच्या विरोधात लढण्याची तयारी दाखविली आहे..

योगेश महाजन

NCP Vs NCP News : अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांना अमळनेर मतदार संघात यंदाची निवडणूक अवघड होण्याची चिन्हे आहेत. त्यांचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्यांच्या विरोधात जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

अमळनेर विधानसभा मतदारसंघात अनिल भाईदास पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. पक्षात फूट पडल्यावर त्यांनी अजित पवार गटाची साथ केली.त्याचे बक्षीस म्हणून ते मंत्री झाले.

अमळनेर विधानसभा मतदार संघातील मतदारांची मर्जी राखण्यात मंत्री झालेले पाटील फारसे यशस्वी झालेले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते त्यांच्यापासून दूरच राहिले आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना शह देण्यासाठी आता शरद पवार (Sharad Pawar) गटाने पाटील यांच्या विरोधात जोरदार राजकीय नाकेबंदी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

शरद पवार यांच्या गटाकडे एक, दोन नव्हे तर चक्क पाच इच्छुक मंत्री असलेल्या अनिल पाटील यांच्या विरोधात दंड थोपटून उभे आहेत.यामध्ये माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, सचिन पाटील, श्याम पाटील आणि प्रशांत निकम यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मतदार संघात चांगले वर्चस्व असलेले कृषीभूषण साहेबराव पाटील यांचे छायाचित्र दोन्ही गट वापरतात.

कृषीभूषण पाटील यांच्या भूमिकेलाही या मतदारसंघात मोठे महत्त्व आहे. मंत्री अनिल पाटील यांना अजित पवार गटात नेण्यात कृषीभूषण पाटील यांची महत्त्वाची भूमिका मानली जाते. कृषिभूषण पाटील यांनी उमेदवारी केल्यास शरद पवार गटाचे हे सर्व पाच इच्छुक त्यांना साथ देणार आहेत. मंत्री अनिल पाटील सध्या महायुतीचे घटक आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. गत निवडणुकीत त्यांची लढत भाजपचे शिरीष चौधरी यांच्याशी झाली होती. त्यात मंत्री पाटील विजयी झाले.

यंदा भाजपचे (BJP) चौधरी यांनीही निवडणुकीची तयारी केली आहे. पक्षाने उमेदवारी न दिल्यास अपक्ष उमेदवारी करण्याची त्यांची मानसिकता आहे. अशा स्थितीत अनिल पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास महायुती एकसंध राहील का? हा मोठा प्रश्न आहे. महाविकास आघाडी अर्थात विरोधकांची एकजूट आणि महायुतीची फाटा फूट होण्याची शक्यता आहे.

यामध्ये मंत्री अनिल पाटील यांची चांगलीच राजकीय अडचण होण्याची चिन्हे आहेत.त्यामुळे अमळनेर मतदार संघात गोंधळाची स्थिती आहे. महायुतीच्या जागा वाटपात त्यावर कसा तोडगा निघतो याल महत्त्व आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात यंदा जोरदार लढत होण्याची चिन्हे आहेत.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT