Sharad Pawar : नाशिकमध्ये वाजणार विधानसभेचे तुतारी?

Preparations for Legislative Assembly begin in the presence of Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात दिवंगत मालोजीराव मोगल यांच्यासमवेत काम केलेल्या अनेक नेत्यांची उपस्थिती असेल.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार नाशिक दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उपस्थित राहतील. या मेळाव्याच्या माध्यमातून पवार काय संदेश देतात याची राजकीय नेत्यांना उत्सुकता आहे.

शरद पवार यांचे जुने सहकारी आणि सहकार क्षेत्रातील नेते दिवंगत मालोजीराव मोगल यांच्या जयंती व पुण्यतिथी एकाच दिवशी आहे. या निमित्त चितेगाव फाटा येथे हा मेळावा होत आहे.

या मेळाव्याला मोगल यांच्यासमवेत काम केलेल्या अनेक नेत्यांची उपस्थिती असेल. त्यामुळे शरद पवार यांच्याशी संबंधित जिल्ह्यातील बहुतांश नेते या मेळाव्याला उपस्थित राहतील. प्रामुख्याने विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर हा मेळावा होत आहे. त्यामुळे पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ वाढविण्याचा कार्यक्रम म्हणून देखील याकडे पाहिले जात आहे.

Sharad Pawar
Congress Cross Voting : 'क्रॉस व्होटिंग' प्रकरण तापलं! काँग्रेस आमदारानं नाना पटोलेंना घेतलं शिंगावर; पक्षाला 'हात' दाखविणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र मोगल यांनी हा मेळावा आयोजित केला आहे. यावेळी राजाभाऊ वाजे, भास्करराव भगरे आणि डॉक्टर शोभा बच्छाव (Shobha Bacchav) हे तीनही नवनिर्वाचित महाविकास आघाडीचे खासदार उपस्थित असतील. त्यांचा सत्कार यावेळी पवार यांच्या हस्ते होईल.

लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील आठ पैकी सहा जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सर्व तीनही खासदार आघाडीचेच आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. तीनही पक्षांच्या नेत्यात सध्या चांगला समन्वय आहे.

या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीसाठी वातावरण अनुकूल व्हावे, म्हणून पवार यांच्या दौऱ्यात विविध पदाधिकारी आणि इच्छुकांची खलबते होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा मेळावा आणि शरद पवार यांचा दौरा दोन्हींकडे विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून पाहिले जात आहे. विरोधकांनीही त्या दृष्टीनेच या मेळाव्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.

Sharad Pawar
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांची शरद पवारांच्या भेटी मागील रहस्य समोर?

नव्या चेहऱ्यांना संधी

शरद पवार आणि नाशिक जिल्ह्याचे राजकारण यांचा संबंध पुरोगामी लोकशाही दलाशी जोडला जातो. 1985 मध्ये जिल्ह्यातील सर्व 13 जागा पवार यांच्या 'पुलोद' ला मिळाल्या होत्या. सध्या देखील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात फूट पडल्यानंतर प्रस्थापित नेते सत्ताधारी पक्षासोबत गेले आहेत. अशा स्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील नव्या नेतृत्वाला संधी देण्याचे जाहीर केले आहे. त्या दृष्टीने या मेळाव्यातून काय संकेत मिळतात याकडे सगळ्यांचेच लक्ष असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com