NCP MLA Sangram Jagtap Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Name Controversy : '...नावच दळीद्री होतं'; संग्राम जगतापांना साक्षात्कार!

Ajit Pawar faction NCP MLA Sangram Jagtap remark calling the old name Ahmednagar “impoverished” has triggered a fresh political debate in Ahilyanagar district : अहिल्यानगर जिल्ह्याचे पूर्वीचे नाव अहमदनगरवरून अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी केलेली टिप्पणी चर्चेत आली आहे.

सरकारनामा ब्युरो

Ahilyanagar Politics : महाराष्ट्र सरकारने अहमदनगर शहराचे आणि जिल्ह्याचे नाव बदलून अधिकृतपणे 'अहिल्यानगर' असं केलं. 4 ऑक्टोबर 2024 मध्ये केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर 8 ऑक्टोबर 2024 रोजी राजपत्र (Gazette) जारी करून या नामांतरावर शिक्कामोर्तब केला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सन्मानार्थ हा निर्णय घेण्यात आला. पण पूर्वीचं नाव हे दळीद्री होतं, असा साक्षात्कार अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना झाला आहे. तसं त्यांच्या विधानाचा व्हिडिओ व्हायरल होतं आहे.

पूर्वीचा अहमदनगर, आताच अहिल्यानगर जिल्हा! 2024 मध्ये अहमदनगरचं, अहिल्यानगर झालं. काना-मात्रा-ऊकार, नसलेले शहराचं नाव म्हणजे 'अहमदनगर', संपूर्ण महाराष्ट्रात, देशात तशी ओळख झाली होती. देशात अन् राज्यात 2014 नंतर हिंदुत्ववादी (Hindutva) सरकार आलं. यानंतर अहमदनगरच्या नामांतराचा मुद्दा हिंदुत्वाशी जोडला गेला.

विधानसभा 2024च्या निवडणुकीपूर्वी महापालिका प्रशासनाने अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर करण्याचा ठराव घेतला. त्यानंतर राज्यात अन् केंद्रात वेगानं हालचाली होत, नामांतरावर 8 ऑक्टोबर 2024 शिक्कामोर्तब झालं. भाजप महायुतीच्या (Mahayuti) लाटेसमोर विधानसभेत महाविकास आघाडीचा पुरता धुव्वा उडाला.

विधानसभा निवडणुकीनंतर अहिल्यानगर शहरातील आमदार संग्राम जगताप यांनी आक्रमक हिंदुत्व स्वीकारलं. यातून अजित पवार राष्ट्रवादीमध्ये वाद झाले. आमदार जगतापांना पक्षाकडून नोटीस देखील बजावण्यात आली. पण आता अजित पवारांच्या निधनानंतर संग्राम जगताप हे हिंदुत्वाच्या मुद्यावर अधिकच आक्रमक आहेत.

आता आमदार जगताप यांना अलीकडचं, पूर्वीचं अहमदनगर हे नाव कसं 'दळीद्री' होतं, याचा साक्षात्कार झाला आहे. तसा तो साक्षात्कार त्यांनी जाहीर कार्यक्रमात बोलून दाखवला. त्यावर समोरच्यांनी बसलेल्यांनी आमदार जगतापांच्या साक्षात्कारावर 'वाह वाही' देखील केली आहे.

नावातच दळीद्री होती; जगताप

आमदार जगताप म्हणाले, "विकासात्मक काम करायचं असेल तर, नाव बदलावा लागेल. पालकमंत्री साहेबांच्या सरकारने निर्णय घेतला अन् नाव बदललं. आज नाव बदललं आहे. जुन नाव बदलून अहिल्यानगर केलं अन् सर्व विकासकामांना वेग मिळाला. जुनी लोकं सांगायची की, नावात दोष आहे. तसं माझं मत आहे की, इथं जुन्या नावात दळीद्री होती. नावाची दळीद्री गेल्यामुळे शहर कात टाकत आहे. यानंतर शहराने विकासाचा वेग घेतला आहे."

महापौर अन् आमदारकी...

आमदार जगतापांनी, नावातील 'दळीद्री'च्या साक्षात्कार अनुभव जाहीर केल्यानंतर, त्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. आमदार जगताप गेली तीन टर्म शहराचं प्रतिनिधीत्व करत आहे. पहिल्या दोन टर्ममध्ये अहमदनगर नावावरच ते विधानसभेला समोरे गेले. महापौरपद देखील उपभोगलं आहे. पण आता त्यांना झालेला साक्षात्कार चर्चेत आला आहे.

जगतापांच्या विधानावर चर्चा

तसं पहिल्यास देशातील जे काही मोजकेच जन्मतारखेचे शहरं आहेत, त्यात पूर्वीचे नाव असलेले अहमदनगर आणि आताचे अहिल्यानगर शहराचा समावेश होतो. आणि या अहमदनगर (आताचे अहिल्यानगर) शहराची स्थापना मलिक अहमद निजाम शाह प्रथम याने 28 मे 1490 रोजी केली होती. तसं पाहिल्यास आमदार जगतापांना हा साक्षात्कार होण्यास बराच उशिर झाल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT