Ramrao Wadkute Rajya Sabha : CM फडणवीसांचा खासदारकीच्या उमेदवाराची निरोप देण्यासाठी फोन; म्हणाले, "बायकोलाही..."

A phone call from Maharashtra CM Devendra Fadnavis to Dhangar leader Ramrao Wadkute has sparked speculation about a possible Rajya Sabha nomination : मराठवाड्यातील धनगर समाजाचे नेते रामराव वडकुते यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेची उमेदवारीसाठी झालेल्या फोनची चर्चा आहे.
Devendra Fadnavis Rajya Sabha Call
Devendra Fadnavis Rajya Sabha CallSarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis Rajya Sabha Call : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. रामदास आठवले, विनोद तावडे, रामदास वडकुते, माया इवनाते यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केला आहे.

यात मराठवाड्यातील धनगर समाजाचे नेते, रामदास वडकुते यांच्या उमेदवारी निश्चित झाल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः फोन केला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी वडकुते यांना उमेदवारी जाहीर सांगत ही बातमी बायकोला देखील सांगू नका, असे सुचवले होते. या फोनवर नेमकं अधिक काय बोलणं झालं, यावर वडकुते यांनीच प्रतिक्रिया दिली आहे.

रामराव वडकुते यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधान परिषदेचे आमदार म्हणून काम केलं आहे. पण आता ते भाजपकडून राज्यसभेवर खासदार म्हणून बिनविरोध जात आहेत. वडकुते यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्याचा फोन, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला होता.

मुख्यमंत्र्यांनी वडकुते यांना उमेदवारीसाठी फोन केला होता. पण उमदेवारीपेक्षा मुख्यमंत्र्यांनी वडकुते यांना केलेल्या फोनची मराठवाड्यात सर्वाधिक चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांचा झालेला फोन अन् बायकोला सुद्धा या फोनची आणि उमेदवारीची कल्पना न देण्याचा दिलेला सल्ल्यावरून वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

Devendra Fadnavis Rajya Sabha Call
Sagar Moholkar : पैलवान मोहोळकरवरील गोळीबारामागे नीलेश घायवळ गँग कनेक्शन; कानशिलात लगावणं भोवलं!

मुख्यमंत्री फडणवीस यांनी, वडकुते यांना फोन करून, तुम्हाला राज्यसभेची (Rajya Sabha) उमेदवारी देण्यात येत आहे. पण ही बातमी बायकोलाही सांगू नका, असं बजावलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या फोनवर वडकुते यांनी प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले, "राजनीती आणि युद्धनीतीमध्ये गुप्तता पाळणं गरजेचं असतं. त्यात आमच्या नेत्यांची राजनीती खूपच कठोर आहे. राजकारण जिथं करायचं, तिथंच त्याचा संबंध ठेवतात."

Devendra Fadnavis Rajya Sabha Call
Devendra Fadnavis : '...तर मीसुद्धा बिनडोक ठरेन'; फडणवीसांचा टोला, नेमकं प्रकरण काय?

मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यामागे काय असू शकतं

मुख्यमंत्र्यांनी बायकोला देखील सांगू नका, असे सांगण्याच्या सल्ल्यावर, कुठेल्याही गोष्टीची विरोधकांना भनक न लगावी किंवा सावध होऊ नये, या अनुषंगांन ही गुप्तता पाळण्यात आली असावी, असा कयास वडकुते यांनी प्रतिक्रियेत मांडला. पत्नीला उमेदवारीचं कधी सांगितलं? यावर वडकुते यांनी, 'त्यांनी म्हटलं. पण आपण थोडी ऐकायचं असतं', असं म्हणताच, उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

वडकुतेंचा भाजप प्रवेश

रामराव वडकुते यांनी ऑक्टोबर 2019मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर भाजपने त्यांना हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावर संधी दिली. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे भाजप निवडणूक प्रमुख आणि प्रभारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.

पवारसाहेबांनी बरंच दिलं; परंतु...

राष्ट्रवादीने मला आमदार केलं होतं. पवारसाहेबांनी सुद्धा मला बरंच काही दिलं. परंतु ज्या वेळेस हिंदुत्वाची लाट तयार झाली. त्यात मी माळकरी आहे. मी माझ्या पक्षाचा त्याग करून कुठलीही अपेक्षा न करता भाजपमध्ये आलो, अहिल्यादेवींच्या विचाराने मी प्रेरित आहे, असे रामराव वडकुते सांगतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com