Sharad Pawar, Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar NCP Nashik : नाशिकमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला 'मविआ' सोबत जायचंय? उद्धव ठाकरेंच्या नेत्याने केला दावा..

Nashik politics : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे नेते वसंत गिते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी मविआमध्ये समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव दिला असल्याचा दावा केला.

Ganesh Sonawane

Nashik Politics : नाशिकमध्ये शिवसेना-भाजप दोघांमध्येच युती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण भाजपकडून सन्मानजनक जागा मिळत नसल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून इतर पर्यायांची चाचपणी केली जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

एकीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाने शिवसेना शिंदे गटासोबतही बोलणी सुरू ठेवली आहे. त्याचवेळी दुसरीकडे महाविकास आघाडीतही समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव दिला आहे. पुणे, पिंपरी चिंचवडप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी प्रस्ताव दिल्याचा दावा उबाठाचे माजी आमदार वंसत गिते यांनी केला आहे. देविदास पिंगळे यांनीही सरकारनामाशी बोलताना त्यास दुजोरा दिला आहे. माझे वसंत गिते यांच्याशी फोनवर बोलणे झाले होते असं ते म्हणाले.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत गिते माध्यमांशी बोलताना म्हणाले होते की, आमची आता कॉंग्रेस, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यासोबत जी बोलणी चालू आहे त्यात आता बाकी मंडळी येत आहेत. कम्युनिस्ट येत आहेत. त्यांच्याशी चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी खासदार देविदास पिंगळे यांचा तीन दिवसांपूर्वी निरोप आला. ते म्हणाले अजित दादांचा आम्हाला निरोप आला की, जे पुण्यात घडंतय ते नाशिकमध्ये करा. आपण सगळे एकत्र लढू..

अजित दादांच्या राष्ट्रवादीला सोबत घ्यायचं की नाही तो अंतिम निर्णय उद्धव ठाकरे साहेब व संजय राऊत यांना विचारल्याशिवाय आम्ही निर्णय घेणार नाही. पण भारतीय जनता पार्टीला सगळे मिळून सामोरे जायचे असेल तर विचार करायला हरकत नाही असही वसंत गिते म्हणाले.

पुण्यात महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येण्यासाठी हालचाली सुरु होत्या. मात्र तिथे तुतारीच्या सर्व उमेदवारांपुढे घडाळाच्या चिन्हावर निवडणूक लढावी असा प्रस्ताव ठेवण्यात आल्याने युती फिस्कटल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे नाशिकमध्ये दोन्ही पवार काका-पुतणे एकत्र येतील का काय अशा चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरु लागल्या आहेत. कारण अजित पवारांच्या पक्षाला नाशिकमध्ये भाजपने फारसे मोजलेले नाही. भाजपच्या जागावाटप फॉर्म्युलात राष्ट्रवादीसाठी केवळ ५ जागा देण्याचा प्राथमिक आराखडा तयार झाल्याचे बोलले जात आहे. अर्थातच हे राष्ट्रवादीला मान्य होणे अशक्य आहे. त्यामुळे अजित पवारांच्या पुढच्या खेळीकडे व निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागून आहे.

त्यामुळे नाशिकमध्ये शिवसेना-भाजप या दोघांचीच युती होण्याची चिन्हे आहेत. कारण भाजपच्या फार्म्युला नुसार शिवसेना ३५ जागा सोडण्याची तयारी भाजपने केल्याची माहिती मिळत आहे. मात्र राष्ट्रवादीला केवळ ५ जागा तर रिपब्लिकन पक्षाला दोन जागा देण्याचा प्राथमिक आराखडा भाजपकडू तयार झाल्याची चर्चा आहे.

दरम्यान यासंदर्भात राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत संवाद साधला. ते म्हणाले नाशिकमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. पण आम्ही आजून समोरासमोर आलेलो नाही. चार वाजेपर्यंत काय ते कळेल - नरहरी झिरवाळ, मंत्री राष्ट्रवादी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT