Nashik MNS : दिनकर पाटील झाले भाजपच्या कमळावर स्वार, आता मनसेचा पुढचा कॅप्टन कोण?

Dinkar Patil Join BJP मनसेचे प्रदेश सरचिटणीस असलेल्या दिनकर पाटील यांनी काल मोठा धमाका करत अचानक भाजपचे कमळ हाती घेतले. त्यामुळे नाशिकमध्ये मनसेला मोठा धक्का बसला आहे.
Dinkar Patil Join BJP
Dinkar Patil Join BJPSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : नाशिक मनसेच्या राजकीय समीकरणात मोठी उलथापालथ झाली असून पक्षाचे शहरातील प्रभावी नेते व 'कॅप्टन' दिनकर पाटील यांनी अखेर भाजपचे कमळ हाती घेतले आहे. पाटील यांच्या प्रवेशामुळे मनसेच्या स्थानिक संघटनेला मोठा धक्का बसला असून, पक्षाच्या पुढील नेतृत्वाबाबतचा प्रश्न आता चर्चेत आला आहे. नाशिकमध्ये मनसेचा पुढचा कॅप्टन कोण? हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

दिनकर पाटील यांनी विधानसभा निवडणुकीवेळी भाजपकडून तिकीट न मिळाल्याने मनसेत प्रवेश केला होता. मनसेने त्यांना पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र भाजपच्या सीमा हिरे यांनी त्यांचा पराभव केला. त्याचवेळी दिनकर पाटील यांना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोठी जबाबदारी दिली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सर्व मान-सन्मान त्यांना देण्यात आला. त्यांना प्रदेश सरचिटणीस करण्यात आलं होतं. मनसेचा नाशिकचा सगळा कारभार दिनकर पाटलांकडे सोपवला होता. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दिनकर पाटील हेच घेत होते.

महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे नियोजन करण्यात दिनकर पाटील हेच सर्वात पुढे होते. बुधवारी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीची घोषणा झाल्यानंतर नाशिक येथील मनसे कार्यालयात दिनकर पाटील यांनी मोठा जल्लोष केला होता. वाजत-गाजत नाचून आनंद साजरा केला. युती झाल्याच्या आनंदात पेढे खाणारे, पेढे वाटणारे पाटील यांनी रात्रीतून निष्ठा बदलत हाती कमळ घेतल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

Dinkar Patil Join BJP
Raj Thackeray setback : भाजपने राज ठाकरेंचा सगळ्यात मोठा नेता फोडला, पक्षप्रवेशही झाला ; नाशिकच्या राजकारणात खळबळ

दरम्यान आता दिनकर पाटील यांच्या जागेवर पक्षात कुणाला संधी दिली जाते याकडे लक्ष लागून आहे. कारण महापालिका निवडणूकीच्या तोंडावर ते भाजपत गेले आहे. त्यामुळे मनसेचे पुढील नियोजन व रणनिती महत्वाची असणार आहे. महापालिका निवडणुकीची जबाबदारी कुणाच्या तरी खांद्यावर सोपवावी लागणार आहे. यासंदर्भात मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी सरकारनामाशी बातचीत केली. त्यांनी नाव न घेता दिनकर पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. पाटील यांचे राजकारण संधीसाधू होते असा हल्लाबोल त्यांनी केला.

दिनकर पाटील यांच्या जागेवर आता कोण ? असा सवाल केला असता अंकुश पवार म्हणाले, आता महापालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. आम्ही सर्व निवडणुकीच्या नियोजनात व्यस्त आहोत. राज साहेबांच्याही सभा-बैठका सुरु आहेत. राज साहेबांचे महाराष्ट्र सैनिक हेच आमच्यासाठी फार मोठं पद आहे. काय निर्णय घ्यायचा तो राज साहेबच घेतील.

Dinkar Patil Join BJP
Devyani Pharande : देवयानी फरांदेंच्या डोळ्यात आलं पाणी, गिरीश महाजनांपुढे झाल्या हतबल..

आम्ही बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालूसरे यांचा इतिहास वाचलेला आहे. नुसता वाचलेला नाही तर तो आमच्या आचरणात आहे. त्यामुळे आम्ही आमचा राजा पण निवडलेला आहे. अशीही कितीही संकटे आली तरी आम्ही राज साहेबांबरोबर आहोत असं अंकुश पवार म्हणाले.

मनसेने दिलेल्या व्यासपीठावर पदं भोगली आणि आज सोडून गेले. संधी मिळताच साथ सोडण्याची प्रवृत्ती आम्हाला नवीन नाही. जनता सर्व बघतेय. साधू आणि संधी साधू यातील फरक जनतेने ओळखावा असे अंकुश पवार म्हणाले.

Dinkar Patil Join BJP
Nashik BJP MLAs : नाशिकमधील भाजपचे तीन्ही आमदार बेदखल, गिरीश महाजनांचाच एककल्ली कारभार

दरम्यान नाशिकमध्ये राज ठाकरे यांच्यासाठी हा काही पहिला धक्का नाही. मनसेमध्ये अनेक पदे उपभोगून मनसेला सोडचिठ्ठी देणाऱ्यांची यादी बरीच मोठी आहे. दिनकर पाटील यांच्यासह वसंत गिते, राहुल ढिकले, यतीन वाघ, आर.डी. धोंगडे, नितीन भोसले, अशोक मुर्तडक अशी बरीच नावे आहेत. यातील यतीन वाघ व अशोक मुर्तडक यांना तर राज ठाकरेंनी महापौर केलं होतं. काहींना आमदार केलं, काहींना नगरसेवक केलं. काहींना पक्षातील विविध पदे दिली. पण एक-एक करत ही सगळी मंडळी अन्य पक्षात दाखल झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com