ajit pawar  sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar : "...म्हणून लाडकी बहीण योजना आणली", अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

Akshay Sabale

मी आता दुसऱ्यांवर टीकाच करणार नाही. माझ्याकडे सांगण्यासाठी खूप कामे आहेत. मी उगाच गुलाबी गाडीत फिरत नाही. गुलाबी स्वप्न दाखवत नाही. अजितदादाचा वादा आहे. स्वप्न पूर्ण करण्याची धमक आणि ताकद आहे, असं विधान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलं आहे.

नाशिक जिल्हा बँक सुरळीत सुरू करणार आहे. बँक कोणी मातीत घातली हे तुम्हाला माहित आहे. त्यावर जास्त बोलणार नाही. ज्यांनी मातीत घातली त्यांना निवडून देऊ नका, असं आवाहन अजितदादांनी ( Ajit Pawar ) केलं आहे. ते नाशिकमधील निफाडमध्ये बोलत होते

अजित पवार म्हणाले, "महिलांना सक्षम करण्यासाठी आम्ही 'लाडकी बहीण योजना' आणली. ती पुढे चालू ठेवायची म्हणून सुरू केली, बंद करायची म्हणून नाही. त्यासाठी तुम्ही आम्हाला सत्तेत पाठवलं पाहिजे. तरंच ही योजना सुरू राहील. त्यासाठी आमच्या नावापुढची बटणं दाबली पाहिजेत."

"महिला आणि तरूण वर्गासाठी आम्ही सरकारच्या योजना आणल्या, त्यात राष्ट्रवादीचं मोठं योगदान आहे. अर्थमंत्री म्हणून मी स्वत: या योजनांचा अभ्यास केला आहे. महिलांना मान सन्मान प्राप्त करून देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. म्हणून 'लाडकी बहीण' ही योजना आम्ही आणली. खर्चाचा अभ्यास आम्ही केला, वायफल खर्च कमी करून काटकसर कशी करावी, हे सगळं पाहिलं. थेंबेथेंबे तळे साचे असतं. त्याप्रकरारे साडेतेरा कोटी जनतेचा संसार आम्ही करत आहोत. तुमचं सबलीकरण व्हावं, असं वाटतंय, तर आम्हाला मतदान केलं पाहिजे," अशी विनंती अजितदादांनी जनतेला केली आहे.

"महायुतीचं सरकार भगिनींना भाऊबीज दिल्याशिवाय गप्पा बसणार नाही. जुलै-ऑगस्ट असे दोन महिन्यांचे पैसे 17 तारखेला तुमच्या खात्यात जमा होतील," असं आश्वासन अजितदादांनी महिलांना दिलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT