Ahmednagar News : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या विधानसभा क्षेत्र समित्यांवर अहमदनगरमध्ये भाजपने कब्जा केला आहे. भाजपचा दबदबा असलेल्या विधानसभा मतदारसंघात आणि क्षेत्रात आमदार, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजनेचा गाजावाज होत असताना, महायुतीत समित्यांवरून कुरघोड्यांचे राजकारण पेटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना समित्यांवर डावलल्याने यासंदर्भात अजितदादांकडे तक्रारी केल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) नगर शहर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या प्रचार आणि प्रसार करताना त्यांच्या फलकांवरून योजनेच्या नावाच्या सुरवातीचा 'मुख्यमंत्री' हा शब्द हटवला होता. तेव्हापासून या योजनेवरून महायुतीत अहमदनगर जिल्ह्यात राजकारण रंगणार, असे सूचक संकेत मिळाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपमध्ये समितींवरून रस्सीखेच दिसते. समित्यांमध्ये भाजपला झुकते माप मिळाल्याने वर्चस्वाचा वाद रंगला आहे. राष्ट्रवादीला काही ठिकाणी संधी दिली असली, तरी त्यांच्यात देखील अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. संगमनेर, श्रीगोंदे आणि पारनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना डावलले आहे. याची तक्रार स्थानिक पदाधिकाऱ्यांना अजितदादांकडे केली आहे.
शिवसेना (Shiv Sena) एकनाथ शिंदे गटाच्या एकाही पदाधिकाऱ्यांना संधी मिळाली नाही. परंतु दिली गेली नाही, की डावलले, अशी चर्चा आहे. तसेच महाविकास आघाडीचे काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार असलेल्या तालुक्यांमध्ये, विधानसभा मतदारसंघातील आमदार, पदाधिकाऱ्यांना समित्यांमधून डावलण्यात आले आहे.
अहमदनगर जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी साडेसात लाख अर्ज दाखल झाले आहे. या अर्जांची छाननी जिल्हास्तरीय पातळीवर पडताळणी होणार आहे. जिल्हा पातळीवर 11 सदस्यांची समिती असणार आहे. पालकमंत्री या समितीचे अध्यक्ष असणार आहे. जिल्हाधिकारी सचिव असतील. तालुक्या पातळीवर समिती असणार आहे. या समितीवर अशासकीय व्यक्ती असणार असून दहा सदस्य असणार आहेत. या समितीत सात सरकारी अधिकारी सदस्य म्हणून असतील. उर्वरीत तीन अशासकीय सदस्य असतील. यात तहसीलदार सचिव राहतील.
या योजनेसाठी विधानसभा क्षेत्रनिहाय अध्यक्ष असणार आहेत. आमदार संग्राम जगताप (नगर शहर), आमदार मोनिका राजळे (शेवगाव-पाथर्डी), आमदार राम शिंदे (कर्जत-जामखेड), शरद गोर्डे (संगमनेर), विद्या बनक (राहाता), रवींद्र म्हसे (राहुरी), आमदार आशुतोष काळे समर्थक चित्रा बर्डे (कोपरगाव), मंगेश घोडके (श्रीगोंदा), सुनील थोरात (पारनेर), मंजुषा ढोकचौळे (श्रीरामपूर) हे विधानसभा क्षेत्रनिहाय अध्यक्ष असणार आहेत. यात नेवासा आणि अकोले तालुक्याच्या निवडी बाकी आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.