Ajit Pawar, NCP Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar : अजित पवारांच्या दौऱ्याआधीच उदय सांगळे यांनी जाहीर केली उमेदवारी

Ajit Pawar Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या (ता.८) सिन्नरला विधानसभा निवडणुकीचा दौरा करीत आहेत. हा दौरा चर्चेचा विषय ठरला

Sampat Devgire

Nashik News: उपमुख्यमंत्री अजित पवार गुरूवारी सिन्नर मतदारसंघाचा दौरा करीत आहे. त्यांच्या दौऱ्याची जोरदार तयारी सुरू आहे. या दौऱ्याच्या तोंडावरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय उदय सांगळे यांनी त्यांना मोठा धक्का दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला बाहेर पडले आहेत. आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासाठी सिन्नरला त्यांचा दौऱाहोत आहे. सिन्नरच्या राजकीय घडामोडीया दौऱ्याचे चर्चेत आहेत.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या दौऱ्याच्या तोंडावरच मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांच्याशी जवळीक असलेले आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय उदय सांगळे यांनी सिन्नर मतदारसंघातून आपली उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या या उमेदवारीचा फटका महायुतीला बसणार की महाविकास आघाडीला याची उत्सुकता आहे.

यापूर्वी सिन्नरमध्ये अजित पवार गटाचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे आणि महाविकास आघाडीचे राजेश गडाख यांच्यात लढत होईल असे चित्र होते. त्यासाठी हे दोन्ही उमेदवारी जोरदार तयारी करीत होते. आता त्याला नवे वळण लागले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पवार यांचे हे दौरे आहेत. त्यामागे भाजपच्या स्थानिक नेत्यांची नाराजी असल्याचे लपून राहिलेले नाही. त्यात आता तिसरा उमेदवार सिन्नर मतदारसंघात उतरणार आहे. श्री. सांगळे यांची भाजप नेत्यांशी जवळीक आहे. त्याचा फटका नक्कीच महायुतीच्या उमेदवाराला बसू शकतो.

गेल्या आठवड्यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नाशिकचा दौरा केला. विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला. त्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री पवार यांनी कळवण मतदार संघाचा दौरा केला. उद्या उपमुख्यमंत्री पवार हे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या सिन्नर, देवळाली आणि निफाड मतदारसंघाचा दौरा करतील.

सध्या मात्र राज्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीत छगन भुजबळ येत्या विधानसभा निवडणुकीत काय भूमिका बजावतात, याचीही उत्सुकता आहे. गेल्या निवडणुकीत श्री. भुजबळ यांनी आमदार कोकाटे यांना मदत केली होती. त्या मदतीच्या जोरावरच ते दोन हजाराच्या निसटत्या मताधिक्याने विजयी झाले होते.

यंदाच्या निवडणुकीत बदललेली राजकीय समिकरण कोणती कुस बदलतात याला खूप महत्त्व आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यात गंभीर आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांमध्ये ही अस्वस्थता आहे. या पक्षातील प्रमुख नेते आणि कार्यकर्ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबर निघून गेले आहेत.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या या दौऱ्यात सिन्नरसह ते देवळाली आणि नाशिक शहरातील राजकीय आढावाही घेतील. एक दिवसाच्या या मुक्कामी दौऱ्यात विधानसभा निवडणुकीचा आढावा आणि आपल्या विद्यमान आमदारांची जागा राखण्याचे नियोजन ते करतील, असे सूत्रांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT