Ahmednagar News : नगर उत्तर दक्षिण मतदारसंघात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत हायव्होल्टेज लढत पाहायला मिळाली होती. अजित पवार गटातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करत नीलेश लंकेंनी खासदारकीची तिकीट मिळवलं होतं.समोर सुजय विखे पाटलांसारखं तगडं आव्हान असतानाही लंकेंनी लढण्याची जिद्द दाखवली होती.
शरद पवारांनी दिलेल्या संधीचं सोनं करत थेट विखेंना पराभवाची धूळ चारली.हा पराभव अजूनही विखेंच्या पचनी पडलेला दिसत नाही.अशातच आता नीलेश लंकेंच्या (Nilesh Lanke) अडचणी वाढल्या आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांच्या निवडीला आता त्यांचे लोकसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी आणि भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी आव्हान दिलं आहे. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात लंकेंविरुद्ध धाव घेतली आहे.सुजय विखे यांच्याकडून औरंगाबाद खंडपीठात खासदार लंकेंच्या नियुक्तीलाच आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली आहे.आता या याचिकेवर मंगळवारी (ता.6) सुनावणी पार पडली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आता या याचिकेतील प्रतिवादी निलेश लंके यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी या याचिकेव्दारे जिल्हाधिकारी यांनी लोकसभा निवडणुकीत निलेश लंके निवडून आल्याचा निर्णय रद्द करावा,अशी मागणी केली आहे.
भाजप नेते आणि लोकसभा निवडणुकीतील पराभूत झालेले उमेदवार सुजय विखे पाटील यांनी खासदार लंके यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांची खासदारकी अडचणीत आणण्यासाठी विखेंकडून मोठं पाऊल उचलण्यात आले आहे. त्यामुळे आता लंकेंसमोर लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर कायदेशीर लढाई जिंकण्याचं आव्हान निर्माण झालं आहे.
लोकसभा निवडणुकीत नगर मतदारसंघातील लढत चांगलीच चर्चेचा विषय ठरला होता.शरद पवारांच्या शिलेदाराने भाजपच्या सुजय विखेंना सुमारे 28 हजार मतांनी पराभवाचा धक्का दिला होता. विखेंचा पराभव करत जायंट किलर ठरलेल्या निलेश लंकेंनी इंग्रजीत शपथ घेऊन विखे पाटलांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले होते. लोकसभा निवडणुकीतील पराभव विखे पाटलांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच त्यांनी लंकेंविरोधात कायदेशीर लढाईचं आव्हान उभं करत थेट न्यायालयाचा दार ठोठावलं आहे.
माजी खासदार सुजय विखेंनी दाखल केलेल्या याचिकेवर आता पुढील सुनावणी 2 सप्टेंबरला होणार आहे.उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निलेश लंकेंना नोटीस बजावण्याचे आदेश दिल्यामुळे आता लंकेंचं टेन्शन वाढलं आहे.विखे यांनी या याचिकेद्वारे काही गंभीर आरोप केले आहेत. नगरमधील लढतीत 40 ते 45 केंद्रांवरील मतमोजणी योग्य पद्धतीने करण्यात आलेली नाही.याच पार्श्वभूमीवर त्यांनी निवडणूक आयोगाकडे रितसर शुल्क भरून फेरपडताळणीची मागणीदेखील केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.