Ajit Pawar & Manikrao Kokate
Ajit Pawar & Manikrao Kokate Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar News: माणिकराव कोकाटेंच्या मंत्रीपदाला अजित पवारांचा खो!

Sampat Devgire

सिन्नर (Sinner): राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) सध्या चागंलेच फार्मात आहेत. काल त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीतच मला उर्जामंत्री करा, अशी इच्छा व्यक्त केली. त्यावर पवार यांनी मात्र आम्हाला तुम्हाला खासदार करायचे आहे, अशी गुगली टाकली. त्यामुळे मतदारसंघातील समर्थकांसमोरच कोकाटे यांच्या आकाक्षांना पवार यांनी आवर घालण्याचा प्रयत्न केल्याने तो चर्चेचा विषय ठरला. (NCP MLA Manikrao Kokate express a wish to be Minister)

सिन्नर तालुक्यातील वीज प्रश्न निकाली काढण्यासाठी शहा येथील १३२ केव्हीए क्षमतेचे वीज केंद्र मार्गी लागले आहे. जानेवारीत हे वीज केंद्र बाबळेश्वर येथून पॉवर ग्रीडच्या माध्यमातून कार्यान्वित करण्यात आले आहे. त्याचे उदघाटन अजित पवार यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी तालुक्यातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार कोकाटे यांनी मतदारसंघातील कामकाजाचा आढावा घेतला. सध्या शेतकऱ्यांच्या वीजेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मला तुम्ही उर्जामंत्री करा, मी शेतकऱ्यांना पुरेसा वीजपुरवठा होईल अशी व्यवस्था करील. अगदी दिवसा वीजपुरवठा देखील करणे शक्य आहे. तुम्ही मला तुम्ही उर्जामंत्री करा, असे सांगितले.

यावेळी पवार यांनी सिन्नर तालुक्यातील बस स्टॅन्ड, ग्रामीण रुग्णालय, सिन्नर नगरपालिकेची इमारत आदी प्रशासकीय इमारती अतिशय सुसज्ज आमदार कोकाटे यांच्या प्रयत्नातून झाल्या आहेत. सिन्नर सारख्या प्रशासकीय इमारती बारामतीतही नाही, असे सांगितले.

अजित पवार पुढे म्हणाले, सरकार आले तर आमदार कोकाटे यांची ऊर्जामंत्री होण्याची इच्छा आहे. त्यांचे हे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल त्यासाठी अगोदर मतदान प्रक्रिया होणे खूप गरजेचे आहे. आम्हाला कोकाटे यांना खासदार करायचे आहे ते तर आमदार होण्याचे म्हणताय असे म्हणातच उपस्थितांमध्ये हशा पिकला. आमदार कोकाटे यांचा अभ्यास तालुका विषयी खूप आहे. अतिशय अभ्यासू हा व्यक्ती असून सिन्नर मधील नदीजोड प्रकल्प तसेच, शेतकऱ्यांच्या हितासाठी कोकाटे यांचे सतत प्रयत्न सुरू असतात. असेही त्यांनी या वेळी नमूद केले.

या प्रसंगी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार दिलीप बनकर, आमदार नितीन पवार, आमदार सरोज अहिरे, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार आशुतोष काळे, ज्येष्ठ नेते भगीरथ शिंदे, सीमंतिनी कोकाटे, बाळासाहेब वाघ, रंजन ठाकरे, रवींद्र पवार, विजय गडाख, राजेंद्र घुमरे, शशिकांत गाडे, विठ्ठल उगले, अक्षय उगले आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT