Jayant Patil
Jayant PatilSarkarnama

Jayant Patil on Riot : छत्रपती संभाजीनगरकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केलं; जयंत पाटलांचा हल्लाबोल

Sate Government : कुठल्याही राजकीय कार्यकर्त्याने तेल ओतण्याचे कृत्य करू नये

Maharashtra Politics : छत्रपती संभाजीनगर येथे रामनवमीची तयारी करताना दोन गटांत मोठा वाद झाला. या वादात पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारीही जखमी झाले आहेत. या घटनेमुळे राज्य सरकारवर टीका होत आहे. शहरात अशी काहीतरी गडबड होण्याची चर्चा होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले, असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.

पुणे येथे जयंत पाटील (Jayant Patil) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पाटील म्हणाले, दोन धर्मांमध्ये तेढ, तणाव निर्माण होणार नाहीत, याबाबत गेल्या काही दिवसांपासून काळजी कमी घेतली आहे. राज्यात अनेक ठिकाणी असे तणाव निर्माण करण्याचे काम काही सुप्त शक्ती जाणीवपूर्वक करत आहेत. औरंगाबादमध्ये अशा स्वरुपचा तेढ होणार, वाद होणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून होती. दुर्दैवाने काल तशी घटना घडली. त्यावर पोलिसांनी वेळीच नियंत्रण आणले."

Jayant Patil
Congress Agitation : 'पहले लढे थे गोरोंसे, अब लढेंगे चोरोंसे'; काँग्रेसचे भाजपविरुद्ध आंदोलन

पाटील यांनी आता काळजी घेण्याचेही आवाहन केले आहे. ते म्हणाले, "काही लोकांना विकासाएवजी द्वेष निर्माण करणारी वक्तव्ये, तेढ निर्माण करणारी भाषणांचा आधार घ्यावा लागतो. दुर्दैवाने त्यांना काही लोक प्रतिसाद देतात. यापुढे दोन धर्मांमध्ये कटुता येणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. या घटनेत कुठल्याही राजकीय कार्यकर्त्याने तेल ओतण्याचे कृत्य करू नये."

द्वेषमूलक वक्तव्याने सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला (Sate Government) फटकारले आहे. त्यावर बोलताना पाटील म्हणाले, न्यायालय बरोबर आहे. राज्यात सुव्यवस्था राखण्याचे काम सत्ताधाऱ्यांची जाबाबदारी असते. आता मात्र सत्तेत असणारीच लोकच अशा मोर्चांना प्रोत्साहन देत आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये हिंदू सुरक्षित होते. आज भाजपचे सरकार असतानाही हिंदुना मोर्चे काढावे लागत आहे. त्यांना खतपाणी राज्य सरकार घालत आहे."

Jayant Patil
Vasant More News : पाच दिवसांपूर्वीच राज ठाकरेंसोबत कार्यक्रम अन् पुन्हा वसंत मोरे नाराज; बॅनरवरुन वादाला तोंड

मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांची वक्तव्ये पाहता त्यांना हिंदुत्वाचे काही देणेघेणे नव्हते. त्यांना निर्विवाद सत्ता हवी होती, असा टोलाही पाटील यांनी लगावला आहे. जयंत पाटील म्हणाले, "मंत्री सांवत म्हणतात की राज्यात सत्तापरिवर्तन करण्यासाठी १०० ते १५० बैठका घेतल्या. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सुत्रे फिरविली. यातून ते हिंदुत्वासाठी भाजपबरोबर गेलो असे सांगतात ते सगळं झूठ. निर्विवाद, निरंकुश सत्ता आपल्या हाती यावी, यासाठी ते सर्व प्रयत्न होते. आता निरंकुश सत्तेचा आविष्कार आपल्याला वेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतोय."

राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी घाबरत आहे. कदाचीत स्थानिक स्वराज्य संस्थांपूर्वी विधानसभेच्या निवडणुका होतील, असा टोला जयंत पाटील यांनीही लागवाला आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसाठी ठाकरे गट आणि राष्ट्रवादीने कोणताही मॅनिफेस्टो तयार केलेला नसल्याचे सांगून चर्चांना पूर्णविराम दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com