Anil Patil & Smita Wagh Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar Politics: जळगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार अनिल पाटील विधानसभेची परतफेड करणार का?

Ajit Pawar;BJP MP Smita Wagh is active, NCP's Ajit Pawar MLA Anil Patil has a headache -अमळनेर नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या खासदार स्मिता वाघ सक्रिय झाल्याने राष्ट्रवादी सावध.

Sampat Devgire

NCP Ajit Pawar News: सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे नगरपालिका निवडणुकांच्या तयारीला सुरुवात झाली आहे. अनेक माजी नगरसेवकांनी याबाबत राजकीय जमवाजमव सुरू केली आहे.

अमळनेर नगरपालिका जळगाव जिल्ह्यातील प्रमुख राजकीय हालचालींचे केंद्र आहे. याचे कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा एकमेव आमदार अनिल पाटील यांचे हे कार्यक्षेत्र आहे. आपली आणि पक्षाची प्रतिष्ठा राखण्यासाठी आमदार पाटील यांना मोठी राजकीय पदर मोड करावी लागणार आहे.

जळगाव जिल्ह्याच्या विविध संस्थांवर भाजपचा वर्चस्व आहे. या भागातील खासदार स्मिता वाघ नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने सक्रिय झाल्या आहेत. अनेक नगरसेवक स्वतःच त्यांच्या संपर्कात आहेत. मदतीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन देखील आहेत.

अमळनेर हा काँग्रेस नेते माजी आमदार शिरीष चौधरी आणि माजी आमदार साहेबराव पाटील यांचे देखील कार्यक्षेत्र आहे. या दोन्ही नेत्यांचा आपल्या भागात पाणी शहराच्या राजकारणावर प्रभाव टिकून आहे. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून हे नेते आपली राजकीय प्रतिष्ठा राखण्यासाठी धडपड करणार हे निश्चित.

विधानसभा निवडणुकीत अमळनेर शहराच्या बहुतांशी माजी नगरसेवकांनी आमदार पाटील यांच्या मागे आपली ताकद झोकून दिली होती. तरीही आमदार पाटील यांना अल्पसे मताधिक्य शहरात होते. विधानसभा निवडणुकीची परतफेड सर्वच माजी नगरसेवकांना नगरपालिका निवडणुकीत अपेक्षित आहे.

भाजपच्या खासदार वाघ आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नगरपालिका निवडणुकीत पक्षाचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी आडाखे बांधले आहेत. भाजप सर्वदृष्टीने सक्षम आणि निवडणुका जिंकणे हे त्यांच्या अस्तित्वासाठी सर्वस्व मानणारा पक्ष आहे. अशा स्थितीत जळगाव मधील एकमेव विधानसभा मतदारसंघात असलेल्या प्रभाव टिकविणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला महत्त्वाचे आहे.

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला अमळनेर शहरातून मदत मिळाली. त्याची परतफेड आमदार पाटील यांना नगरपालिका निवडणुकीत माजी नगरसेवकांना बळ देऊन करावी लागणार आहे. या निवडणुका जिंकणे आमदार पाटील यांच्या राजकीय प्रतिष्ठेसाठी महत्त्वाचे आहे. निमित्ताने उपमुख्यमंत्री पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागणार असल्याने अंमळनेर शहरावर वर्चस्व कोणाचे यासाठी आत्तापासूनच महायुतीतील पक्षच एकमेकांचे वस्त्रहरण करण्यासाठी सक्रिय झाले आहेत.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT