Balasaheb Vikhe Patil biography : जातीपातीच्या गोष्टी करणाऱ्यांनी माझ्याकडे येऊ नका; नितीन गडकरींनी नेमकं कोणाला सुनावलं

Union Minister Nitin Gadkari Launches Second Edition of Balasaheb Vikhe Patil Autobiography in Loni : भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित लोणी इथं लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील लिखित ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन झालं.
Balasaheb Vikhe Patil biography
Balasaheb Vikhe Patil biographySarkarnama
Published on
Updated on

Deh Vechava Karani second edition : देशात अन् राज्यात कट्टर हिंदुत्ववादी सरकार आहे. देशासह राज्यात भाजप मंत्री, नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी हिंदुत्वाच्या मुद्यावर सतत आक्रमक दिसतात. काही नेते, मंत्री यांच्या कार्यपद्धतीचा भाग देखील हिंदू झाली आहे. असे असतानाच, भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वेगळी भूमिका घेताना दिसतात.

लोणी इथं लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील लिखित ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी बाळासाहेब विखेंची सहकार चळवळ यशस्वी होण्यामागील रहस्य सांगताना, जातीपातीच्या गोष्टी करणाऱ्यांनी माझ्याकडे येऊ नका. माणूस हा जातीने नव्हे, तर गुणांनी मोठा होतो. समाजातली अस्पृश्यता समूळ नष्ट झाली पाहिजे. सामाजिक एकता प्रस्थापित झाली पाहिजे, असे ठणकावून सांगितले.

लोणी इथं लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील लिखित ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe), माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, आमदार शिवाजी कर्डीले, आमदार मोनिका राजळे, आमदार काशिनाथ दाते, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार अमोल खताळ, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, शालिनी विखे पाटील उपस्थित होते.

Balasaheb Vikhe Patil biography
Nitin Gadkari On Shirdi Road : नितीन गडकरींना अहिल्यानगरमध्ये यायला वाटते लाज! त्याला 'हा' रस्ता आहे, कारण...

नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी जातीपातीच्या गोष्टी करणाऱ्यांनी माझ्याकडे येऊ नका. माणूस हा जातीने नव्हे, तर गुणांनी मोठा होतो. समाजातली अस्पृश्यता समूळ नष्ट झाली पाहिजे. सामाजिक एकता प्रस्थापित झाली पाहिजे. याच उद्देशाने बाळासाहेब विखेंनी सहकार चळवळीत मोठे यश मिळाले. मात्र इतर ठिकाणी अपयश देखील समोर आले. चळवळ चांगली असली, तरी काही अधिकारी काम चालू देत नाहीत, याचा अनुभव देखील सांगितला.

Balasaheb Vikhe Patil biography
Ghanshyam Shelar NCP : वर्षभरात तीन पक्ष बदलले, आता अजितदादांकडे गेले; पुढचा नंबर कोणत्या पक्षाचा?

मी सहकारी संस्थेच्या उत्पादनात विक्रीच्या दुकानाच्या उद्घाटनाला गेलो. शेतकरी चळवळीचे नेते शरद जोशी तिथे उपस्थित होते. ते म्हणाले सहकार क्षेत्राचे आणि सहकार चळवळीचे यश हे नेतृत्वात असते. म्हणजेच विठ्ठलराव विखे आणि त्यानंतर बाळासाहेब विखे यांचे नेतृत्व मिळाले, म्हणून सहकार चळवळ यशस्वी झाली, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

सहकार चळवळ कशी चालवायची याचे मार्गदर्शन 'देह वेचावा कारणी', या पुस्तकातून मिळेल. मात्र सहकार चळवळ कशी बुडवायची याची माहिती आमच्या विदर्भात जागोजागी मिळेल आणि त्याचे पुस्तक यापेक्षाही मोठे होईल, असा चिमटा नितीन गडकरी यांनी काढला. ती माणसे कोणत्या पक्षाची होती, हे महत्त्वाचे नाही. पैसा कमावणे हा गुन्हा नाही. परंतु राजकारण किंवा समाजकारण हा पैसे कमावण्याचा धंदा होऊ शकत नाही, असे देखील नितीन गडकरी यांनी सुनावले.

सहकार चळवळीतील पथ्य न पाळल्यामुळे ते मोडून पडले. सूतगिरण्या बंद पडल्या, कारखाने बंद पडले. गुणात्मक बदल सहकार चळवळीत व्हायचे असतील तर नेतृत्व गुणात्मक असले पाहिजे. नेतृत्व तपस्वी व त्यागी असेल, निष्ठा पाळणारे असेल समाजातील गोरगरीब, मजूर यांच्याबद्दल सहानुभूती ठेवणारे असेल, संवेदनशीलता बाळगणारे असेल, तर यश नक्कीच मिळते. हे विठ्ठलराव विखे पाटील आणि बाळासाहेब विखे पाटील यांनी आपल्या आयुष्यात सिद्ध केल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com