Ajit Pawar, Dy C. M.  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

अजित पवारांच्या जादूच्या कांडीने बालेकिल्ल्यातच काँग्रेस धाराशायी!

नाशिक जिल्ह्यात काँग्रेस पक्ष प्रभावी असेल तर तो मालेगाव शहरात होता.

Sampat Devgire

मालेगाव : नाशिक जिल्ह्यात काँग्रेस पक्ष प्रभावी असेल तर तो मालेगाव शहरात होता. (Congress powerfull in Nashik district only in Malegaon) महापालिका, विधानसभा दोन्ही ठिकाणी त्यांचे वर्चस्व होते. मात्र पक्षाच्या नेत्यांकडून उपेक्षा झाली, ही येथील नेत्यांची तक्रार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (NCP leader Ajit Pawar) यांनी मात्र त्यांना मान-सन्मान देत ६ कोटींचा निधी दिला. या एकाच कारणामुळे बालेकिल्ला असलेल्या मालेगाव शहरातील काँग्रेसचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसवासी झाले का? हा सध्या चर्चेचा विषय आहे.

उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री पवार यांनी काँग्रेसच्या महापौर ताहेरा शेख, त्यांचे पती माजी आमदार रशीद शेख आणि त्यांचे पुत्र माजी आमदार आसीफ शेख शहराच्या काही मागण्या घेऊन सहा महिन्यांपूर्वी मंत्रालयात गेल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसच्या मंत्र्यांनी त्यांना फारसी आपुलकीने दाखवली नाही, अशी त्यांची तक्रार आहे. याउलट ते अजित पवार यांच्याकडे गेल्या असत्या, त्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन त्यांना साह कोटींची निधी देखील उपलब्ध करण्यात आला. माजी आमदार आसीफ शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना हे कारण पुढे केले होते. दोन दिवसांपूर्वी माजी आमदार रशीद शेख यांनी काँग्रेसच्या पदांचा राजीनामा देताना देखील त्याचाच पुनरूच्चार केला. त्यामुळे अजित पवार यांच्या सहा कोटींच्या निधीच्या जादूच्या छडीने बालेकिल्ला असलेल्या मालेगाव शहरात काँग्रेस पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. हा चर्चेचा विषय आहे.

याबाबत माजी आमदार रशीद शेख यांनी आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले. काँग्रेस पक्षात जनाधार असलेला एकही नेता. तरीही अतिशय क्षुल्लक व कोणाचाही पाठींबा नसलेल्या राजाराम पानगव्हाणे यांच्यासारख्या नेत्याला जिल्हाध्यक्ष पदावरून काढल्यावर पक्ष लगेच प्रदेश उपाध्यक्ष कसा करतो?. त्यांची एव्हढी दखल घेण्याचे कारण काय?. अशा लोकांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करायचे का?. त्यांचा हा राग त्यांनी विविध पातळ्यांवर व्यक्त केला. मात्र त्याचा परिणाम म्हणून त्यांनी पक्षाच्या पदांचा राजीनामा देत आपल्या समर्थकांनी राष्ट्रवादीवासी झालेले पुत्र, माजी आमदार रशीद शेख यांच्यामागे उभे रहावे असे आवाहन त्यांनी केले आहे. कदाचीत स्वतः पक्ष न सोडता, पक्षानेच आपल्याला बाहेरचा रस्ता दाखवावा असा त्यांचा हेतू असावा. मात्र या एक्झीटचा राजकीय झटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण त्यांचे विरोधक व शहराचे आमदार, एमआयएम पक्षाचे मौलाना मुफ्ती त्याचा फायदा घेऊन काँग्रेस पक्षात परतू शकतात. आगामी महापालिका निवडणुकीत महापालिकेची सत्ता शेख कुटुंबाकडेच रहावे, असे आडाखे बांधून रशीद शेख पावले टाकत आहात. महापालिकेच्या निकालावर पुढचे चित्र ठरेल.

गेल्या काही दिवसांतील राजकीय घडामोडी त्याला दुजोरा देणाऱ्या आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यांना एमआयएम पक्षाविषयी अजिबात सहानुभूती नाही. त्याची झल आमदार मौलाना यांना बसत असते. शहरातील शासकीय समित्यांच्या सदस्यांची नियुक्ती नुकतीच झाली. त्यात संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी आसीफ शेख यांचे समर्थक, माजी नगरसेवक शकील जानी बेग यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली. उर्वरीत बुहतांश सदस्य आसीफ शेख यांचे समर्थक आहे. एमआयएमला त्यात औषधालाही स्थान नव्हते. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या नियुक्त्या केल्या. अन्य समित्यांची स्थिती तशीच आहे. त्यामुळे स्वतः आमदार मौलाना मुफ्ती यांची राजकीय कोंडी झाली आहे. भविष्यात ही कोंडी फोडण्यासाठी ते काँग्रेस पक्षात परतण्याची शक्यता अगदीच नाकारत येत नाही. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात हे घडले, त्याला प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जादूची छडी कारणीभूत ठरली.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT