काँग्रेस सोडलेले रशीद शेख म्हणतात, महापालिका निवडणूक लढविणार नाही

आपल्या समर्थकांनी आगामी काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष आसिफ शेख यांना साथ द्यावी.
Shaikh Family & followers, Malegaon
Shaikh Family & followers, MalegaonSarkarnama

मालेगाव : कॉंग्रेस महानगर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शहरातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांची प्रामुख्याने माझ्यावर विश्‍वास असलेल्यांची द्विधा मनस्थिती होती. (Those who had faith on me are confused) आपल्या समर्थकांनी आगामी काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष आसिफ शेख यांना साथ द्यावी. (My follwers shall cooperate Asif shaikh) मी स्वत: आगामी महानगरपालिका निवडणूक लढविणार नाही. (I will not contest municiple corporation election) आमच्या कुटुंबात कुठलाही वाद नाही असे माजी आमदार रशीद शेख (ExRashid Shaikh) यांनी सांगितले.

Shaikh Family & followers, Malegaon
काँग्रेसने उधळले, एकनाथ खडसे- गिरीश महाजनांचे राजकीय इमले

राजीनाम्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये असलेला गोंधळ दूर व्हावा, यासाठी आपण हे आवाहन करीत आहे. मी व माझ्या समवेतचे कॉंग्रेस नगरसेवक कॉंग्रेसमध्येच आहेत. पक्ष कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये खुल्या दिलाने आसिफ शेख यांची साथ द्यावी. आपण आजवर कॉंग्रेसशी एकनिष्ठ होतो. सन १९९५ मध्ये मला पक्षाने बडतर्फ केले. त्यानंतरही मी कुठल्या पक्षात गेलो नाही. जनजागरण समितीच्या नावाने स्वतंत्रपणे काम केले. विरोधक शेख कुटुंबात वितुष्ट असल्याच्या अफवा पसरवित आहेत. आमच्या कुटुंबात कधीही दुरावा नव्हता. आम्ही प्रत्येक निवडणूक सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक काम एकत्रितपणेच करत आला. पक्ष आगामी काळात कॉंग्रेस अध्यक्षपदी कुणाचीही नेमणूक करु शकेल. आपण त्यांच्या नेतृत्वात काम करु. सध्यातरी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना आघाडीचेच शासन आहे.

या वेळी माजी आमदार आसिफ शेख, कॉंग्रेसचे मनपा सभागृहनेते अस्लम अन्सारी, नगरसेवक सलीम अन्वर, खालीद शेख, रिजवान अहमद, इरफान शेख, सलीम अहमद, जाकीर शेख आदींसह बहुसंख्य कॉंग्रेस कार्यकते उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com