Devendra-Fadanvis-Ajit-Pawar.jpg Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Devendra Fadanvis Politics: मुख्यमंत्री फडणवीस, कृषिमंत्री कोकाटे यांच्या जिल्हा बँकाच संकटात, सरकार पुढे पेच!

Ajit Pawar; The fate of four banks, including Nagpur and Nashik, will be decided on April 7-राज्यातील चार जिल्हा बँका वसुली न झाल्याने आर्थिक संकटात सापडल्या आहेत.

Sampat Devgire

Ajit Pawar news: मावळत्या आर्थिक वर्षात राज्यातील सहकारापुढे विविध अडचणी आहेत. राज्यातील चार जिल्हा बँका टिकणार की बंद होणार अशी स्थिती आहे. मध्ये थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्हा बँकेचा ही समावेश आहे.

राज्याच्या राजकारणात वर्चस्व निर्माण केलेले नेते आपल्या जिल्ह्यात मात्र आर्थिक शिस्त पाळण्यात अपयशी ठरल्याचे चित्र आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्हा बँकेचा देखील समावेश आहे. सहकारात हा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारला हा प्रश्न सोडवावा लागेल.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (नाशिक) आणि पंकजा मुंडे (बीड) या बँकांनाही बँकिंग परवाना टिकविण्यासाठी वसुलीचे उद्दिष्ट होते. हे उद्दिष्ट विविध राजकीय अडथळ्यांमुळे पूर्ण होऊ शकलेले नाही. येत्या ७ एप्रिल ला मुंबई या चारही बँकांच्या प्रतिनिधींची बैठक होत आहे. बैठकीत शासन काय निर्णय घेते याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

मावळते आर्थिक वर्ष संपले. यामध्ये नाशिक जिल्हा बँकेची वसुली अतिशय कमी झाली आहे. जिल्हा बँकेला 991 कोटी रुपयांची कर्ज वसुली अपेक्षित होती. त्या तुलनेत अवघी २३६.७८ कोटींची वसुली झाली आहे. त्यामुळे बँकेच्या अडचणीत भर पडली आहे.

नाशिक जिल्हा बँकेची थकबाकी दोन हजार ३०० कोटी रुपये आहे. बँकेचे अनुत्पादक कर्ज एक हजार कोटी आहे. यातील किमान शंभर कोटी रुपये मावळत्या आर्थिक वर्षात वसुली अपेक्षित होती. ती झालेली नाही.

नाबार्डने राज्यातील नाशिक नागपूर बीड आणि वर्धा या चार जिल्हा बँकांना बँकिंग परवाना बाबत इशारा दिला होता. त्यामुळे या बँकांनी संबंधित निकष पाळलेले नाही. स्थितीत या बँकांचे अस्तित्व टिकणार की, परवाना रद्द होणार याची धास्ती सहकार्यातील शेकडो विविध कार्यकारी संस्थांना वाटते आहे.

-------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT