Shrirampur Bandh : हत्या झालेल्या आकाश दुबय्या यांच्या वडिलांनी आपल्या मनातील आक्रोशाला आज वाट मोकळी करून दिली. आकाश दुबय्या यांच्या हत्येनंतर श्रीरामपूरमधील गुन्हेगारीविरोधात स्थानिकांमध्ये प्रचंड आक्रोश आहे.
तीन दिवस बंद पाळल्यानंतरही पोलिस प्रशासनाकडून ठोस अशी अॅक्शन होताना दिसत नसल्याने, मयत आकाशच्या वडिलांनी आजच्या आक्रोश मोर्चात आपल्या संतप्त भावनांना वाट मोकळीक करून दिली.
शेखर दुबय्या म्हणाले, "श्रीरामपूरमधील (Shrirampur) बेग आणि ज्जधे या दोघांनी मिळून माझ्या मुलाला मारले आहे. यांचा 'एन्काउंटर' झाला पाहिजे. फाशी झाली पाहिजे. वडिलांसमोर मुलाची हत्या झाली आहे, माझी काय भावना असेल. कोणाच्यात दम नसेल, तर मला हत्यार द्या. मी यांचा 'एन्काउंटर' करतो. मला फाशी द्या. मला न्याय द्या."
गुन्हेगारांकडे (Crime) कोटी-कोटी रुपयांची वाहने आहेत. ही वाहने त्यांना मिळतात कोठून. यातूनच ते गुन्हेगारी करतात. अवैध धंद्यातून ते गुन्हेगारीला पोसतात. नवी पिढीला ट्रेनिंग देतात. व्यापाऱ्यांना मारायला लावतात, असे खळबळजनक आरोप देखील शेखर दुबय्या यांनी केला.
सागर बेग याने माध्यमांसमोर येत, आकाश यांचे वडील शेखर यांनी फिर्यादीत कुठेही बेग याचे नाव घेतलेले नाही. यावरून या घटनेची आमचा संबंध येत नाही, असा दावा केला आहे. यावर शेखर दुबय्या म्हणाले की, ज्यावेळी घटना घडली, त्यावेळी या मागे कोण आहे, याची कल्पना नव्हती. परंतु घटनेनंतर जसे दिवस पुढे सरकले, त्यानंतर एक-एक घटनाक्रम आणि गोष्टी समजत गेल्या. बेग आणि जेधे कुटुंब नातेवाईक आहे. मी स्वतः हे आरोप करत आहे, यापेक्षा अधिक काय पाहिजे, अतिक्रमण करुन राहतात, यांचे अतिक्रमणे काढली पाहिजे, असे शेखर दुबय्या यांनी म्हटले.
घटना झाल्यानंतर तुम्ही सागर बेग याला संपर्क केला होता, असा दावा केला जात आहे. यावर शेखर दुबय्या यांनी, घटना होण्यापूर्वीच मी सागरला फोन केला होता. झाल्यानंतर नाही. हाॅटेलमध्ये आलेले लोक गुन्हेगार तुझे असतील, तर घेऊ जा, असे त्याला मी सांगितले होते. कारण मला एका मित्राने सांगितले होते की, तुझ्या हाॅटेलमध्ये आलेले लोकं हे बेग गँगचे आहेत, असा दावा केला आहे.
दरम्यान, श्रीरामपूरकरांनी गुन्हेगारीविरोधात पुकारलेल्या बंदचा चौथा दिवस आहे. आज गुन्हेगारीविरोधात सर्वसामान्य, व्यापारी आणि राजकीय पक्षांनी एकत्र येत मोर्चा काढला आहे. या मोर्चात मयत आकाश दुबय्या यांचे वडील शेखर दुबय्या सहभागी होत, हत्येसंदर्भातील घटनाक्रमावर खळबळजनक दावे केले आहेत.
श्रीरामपूरमधील गुन्हेगारीविरोधात सुरू असलेल्या बंदच्या चौथ्या दिवशीही बाजारपेठ बंद होती. शाळा बंद होत्या. तसेच आज शहरातील पेट्रोलपंप चालकांनी देखील बंदमध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. श्रीरामपूर आणि जिल्हा पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारकडून या हत्येची, बंदची कशी दखल घेतली जाते, याकडे आता लक्ष लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.