BJP No Confidence Motion Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP No Confidence Motion : अकोलेत भाजपलाच भाजपचा धक्का! स्वतःच्या नगराध्यक्षाविरोधात 12-0 ने अविश्वास; वैभव पिचडांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

BJP rebels join opposition as Akole president loses trust vote : भाजपचेच आठ नगरसेवक ठरावाच्या बाजूने; चार सदस्य गैरहजर, व्हिपभंगाची कारवाई होण्याचे संकेत; ठाकरे सेना आणि अजित पवार राष्ट्रवादीच्या सदस्यांचीही साथ

Pradeep Pendhare

Akole Nagar Panchayat : अकोले नगरपंचायतीत भाजपचे स्पष्ट बहुमत असताना भाजपच्याच नगरसेवकांनी भाजपच्या नगराध्यक्षाविरोधात अविश्वास ठराव मंजूर केला. यामुळे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव शुक्रवारी विशेष सभेत 12 विरुद्ध 0 मतांनी मंजूर झाला.

भाजपचे चार आणि काँग्रेसचा एक नगरसेवक सभेला अनुपस्थित राहिले. यामुळे नगराध्यक्षपद रिक्त झाले. भाजपची सत्ता असून देखील भाजपच्या नगराध्यक्षाविरोधात बहुमताने अविश्वास ठराव मंजूर होणे, हे माजी आमदार वैभव पिचड यांना धक्का मानला जात आहे.

या विशेष सभेला भाजपचे आठ, अजित पवार राष्ट्रवादीचे दोन आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे दोन, असे एकूण 12 नगरसेवक उपस्थित होते. नगराध्यक्ष (Nagaradhyaksha) बाळासाहेब वडजे यांच्याविरोधातील अविश्वास ठरावावर आवाजी मतदान घेण्यात आले. उपस्थित सर्व 12 नगरसेवकांनी ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने तो दोन-तृतीयांशपेक्षा अधिक बहुमताने मंजूर झाला.

सभेला भाजपच्या (BJP) गटनेत्या तमन्ना मोहसीन शेख, सोनाली नाईकवाडी, कविता शेळके, माधुरी शेणकर, प्रतिभा मनकर, जनाबाई मोहिते, श्वेताली रुपवते, विमल मंडलिक, नवनाथ शेटे, सागर चौधरी, आरीफ शेख आणि हितेश कुंभार उपस्थित होते. ज्यांच्याविरोधात अविश्वास ठराव होता ते नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, उपनगराध्यक्ष शरद नवले, नगरसेविका शीतल वैद्य, वैष्णवी धुमाळ, तसेच काँग्रेसचे नगरसेवक प्रदीप नाईकवाडी हे सभेला अनुपस्थित राहिले.

भाजपचे बंडखोर सदस्य एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी भेट घेतल्याचे सांगितले जाते. ही भेट विकास निधीसाठी होती, असा दावा सोनाली नाईकवाडी यांनी केला आहे. या विशेष सभेला गैरहजर राहणाऱ्या चार भाजप सदस्यांवर व्हिप न पाळल्याबद्दल योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले.

वैभव पिचड यांना धक्का

चार वर्षापूर्वी नगरपंचायतीच्या निवडणुकीत माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली 17 पैकी 12 जागा जिंकत भाजपने बहुमताने सत्ता मिळवली. परंतु दीड वर्षापासून नगरसेवकांमध्ये सुरू असलेली नाराजी आणि अंतर्गत मतभेद वेळेत मिटविण्यात पक्ष नेतृत्वाला अपयश आल्याचे घडामोडीतून स्पष्ट होत आहे. माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वालाही हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

बंडखोरांच्या हालचालींकडे लक्ष

माजी नगराध्यक्ष सोनाली नाईकवाडी व अन्य 12 सदस्यांनी 20 मे रोजी नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे व उपनगराध्यक्ष शरद नवले यांना पदावरून काढून टाकण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली. यात विशेष सभेतून वडजे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. परंतु यानिमित्ताने भाजप बंडखोर, अजित पवार राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांची एकी केवळ सत्तेपुरती आहे की, त्यातून काही नवीन समीकरण आकार घेते, याकडे राजकीय धुरींचे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT