BJP News : भाजप विरुद्ध भाजप! अकोलेच्या नगराध्यक्षाच्या भवितव्याचा फैसला पुढील दोन दिवसांत

Akole Nagar Panchayat : नगराध्यक्षांविरोधातील अविश्वास ठरावासाठी विशेष सभा; भाजपच्या 9 नगरसेवकांची बंडखोरी, तमन्ना शेख यांचा व्हिप, अकोल्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे
Akole Nagar Panchayat
Akole Nagar PanchayatSarkarnama
Published on
Updated on

Akole Nagar Panchayat : अकोले नगरपंचायतीचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर निर्णय घेण्यासाठी 17 जुलैला विशेष सभा बोलावण्यात आली आहे. या सभेकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. या सभेसाठी भाजपच्याच नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे. यातून पक्षातील अंतर्गत संघर्ष उफाळल्याचे दिसत आहे.

नगरपंचायतीत भाजपचे (BJP) 12 सदस्य आहेत. भाजपचे बाळासाहेब वडजे नगराध्यक्ष आहेत. मात्र, पक्षांतर्गत मतभेद तीव्र झाल्याने भाजपच्या नऊ सदस्यांनी नगराध्यक्षांविरोधात भूमिका घेत नगरसेविका तमन्ना शेख यांची गटनेतेपदी निवड केली आहे. या बदलाला जिल्हाधिकाऱ्यांनीही मान्यता दिली आहे.

माजी नगराध्यक्ष (Nagaradhyaksha) सोनाली नाईकवाडी यांच्यासह 12 सदस्यांनी 20 मे रोजी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांना पदावरून हटविण्याची मागणी केली होती. त्यानुसार उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण ढगे यांच्या अध्यक्षतेखाली 17 जुलैला विशेष सभा होणार आहे.

Akole Nagar Panchayat
BJP Internal Conflict : भाजपमध्ये अंतर्गत बंड; नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे गटनेतेपदावरून हटवले, वैभव पिचड यांच्यासमोरील आव्हाने वाढली

भाजपच्या गटनेत्या तमन्ना शेख यांनी भाजप सदस्यांनी ठरावाचे समर्थन करावे यासाठी व्हिप बजावला आहे. भाजपचे बंडखोर सदस्य आणि भाजपचे वि्ऱोधी सदस्य हा ठराव मंजूर व्हावा यासाठी एकत्र आले आहेत.

Akole Nagar Panchayat
Shrirampur Crime : "मला हत्यार द्या, मीच एन्काउंटर करतो..."; आकाश दुबय्याच्या वडिलांचा आक्रोश, बेग गँगवर गंभीर आरोप

नगरपंचायतीत एकूण 17 सदस्य असून, त्यात भाजपचे 12, शिवसेनेचे 2, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आणि काँग्रेसचा 1 सदस्य आहे. नगराध्यक्षांना पदावरून हटविण्यासाठी भाजपच्या आठ सदस्यांसह विरोधी पक्षांच्या पाच सदस्यांनी एकत्र येत अविश्वास ठराव दाखल केला आहे. अविश्वास ठराव काय निर्णय होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

भाजपमधील अंतर्गत गटबाजी ही सत्तेपुरता मर्यादित आहे की, अकोले शहरात आगामी काळात नवीन राजकीय समीकरणे तयार होणार याची नांदी आहे, यावर खुमासदार चर्चा रंगू लागल्या आहेत. सहा महिन्यानंतर अकोले नगरपंचायतीची निवडणूक अपेक्षित आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com