Akole Rajur health crisis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Akole Rajur hepatitis outbreak : 'कावीळ साथ आटोक्यात आणा, हलगर्जीपणा खपवून घेणार नाही'; मंत्री विखेंनी मैदानात उतरवली 'प्रवरा' यंत्रणा

BJP Minister Radhakrishna Vikhe Patil Reviews Health Department to Control Hepatitis Outbreak in Akole Rajur Ahilyanagar : अकोल्याच्या राजूर भागात पसरलेल्या कावीळ साथीवर आरोग्य विभागानं तातडीनं कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिल्या.

Pradeep Pendhare

Akole Rajur health crisis : अकोले तालुक्यातील राजूर इथं कावीळचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेतला. तातडीने सर्वतोपरी उपाययोजना राबवाव्यात, आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, यात कोणी दोषी आढळल्यास चौकशी करून कारवाई केली जाईल, अशी तंबी मंत्री विखे पाटील यांनी दिली.

तसेच डॉक्टरांची टीम पूर्णवेळ तैनात राहणार असून, रक्त तपासणीचे अहवाल लवकर मिळावेत, यासाठी प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या माध्यमातून विशेष यंत्रणा मंत्री विखे पाटलांनी अकोल्याच्या मैदानात उतरवली आहे.

राजूरमध्ये कावीळग्रस्त रुग्णांची संख्या 300 च्या आसपास आहे. आतापर्यंत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी राजूर येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधला. आरोग्य विभागाच्या कामाचा आढावा घेतला. त्यात अनेक उणिवा जाणवल्याने, आरोग्य विभागाला कारवाईची तंबी देखील दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे आमदार किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे आणि आदिवासी प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे उपस्थित होते.

अकोले इथं जिल्हा परिषदेच्या शाळेत उभारण्यात आलेल्या विशेष उपचार कक्षाला भेट देत पालकमंत्र्यांनी ग्रामस्थं, रुग्ण व वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. रुग्णांमध्ये मुले आणि मुलींची संख्या अधिक असल्याने त्यांच्या आहाराचे तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेण्यास सांगितले. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे पाणीपुरवठा दूषित झाल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तातडीने चौकशीचे आदेश दिला.

तलाठी आणि ग्रामसेवक मुख्यालयावर अनुपस्थित राहत असल्याची बाब बैठकीत मांडण्यात आली. यावरही पालकमंत्र्यांनी प्रशासनातील सर्व विभागांनी साथरोग आटोपेपर्यंत मुख्यालय सोडू नये, असे स्पष्ट निर्देश दिले. कोविड संकटकाळातील अनुभव लक्षात घेऊन गावातील सर्व कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यासाठी आशा सेविकांना सक्रिय करावे, तसेच राजूरसह शेजारील गावांचेही सर्वेक्षण करावे, असे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले.

पाण्यात टाकण्यासाठी लागणारे जंतुनाशक औषध आणि रक्त तपासणीसाठी लागणारी यंत्रणा जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून तातडीने उपलब्ध करून द्यावी. हे संकट रोखणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. ग्रामस्थं आणि प्रशासन यांनी परस्पर समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री विखे पाटील यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT